आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Business Personal Finance Your Pan Card Will Become Invalid After 30 June If Not Linked With Aadhaar

30 जूनपर्यंत नाही केले हे काम तर रद्द होऊ शकते Pan Card, 5 हजाराचा दंड वेगळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड 30 जूनपर्यंत आधार कार्डासोबत लिंक केले नाही तर ते रद्द होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला यासाठी 5 हजार रुपये दंडही भरावा लागेल. एवढेच नाही तर 31 जुलैपर्यंत आयकर परतावा भरण्यासही तुम्हाला अनेक बाबींचा सामना करावा लागेल. आयकर विभागाने ही तारीख वाढविण्यास नकार दिला आहे. 

 

 

पीएमएलए कायद्यानुसार आधार लिंक करणे गरजेचे 
केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग (पीएमएलए) कायद्यातंर्गत बँक अकाउंट, पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यासाठी 30 जून ही डेडलाइन दिलेली आहे. केंद्र सरकारने आधार बँक किंवा अन्य खात्यांसोबत जोडण्यासाठी तारीख वाढवली तर त्याचा फायदा कोट्यावधी लोकांना होणार आहे. 

 

 

आयकर विभागाने या लोकांना दिली आहे सूट
आयकर विभागाने काही लोकांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यापासून सूट दिली आहे. यात एनआरआय, भारतात आलेले पाहुणे, 80 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. ही सूट तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुमचे आधार कार्ड बनलेले नसेल. 

 

 

असे करा आधारला पॅनशी लिंक
- सगळ्यात पहिल्यादा आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर (www.incometaxindiaefiling.gov.in) जा. तेथे डाव्या बाजूला लाल रंगात 'लिंक आधार'वर क्लिक करा.
- तुमचे अकाउंट नसल्यास रजिस्ट्रेशन करा.
लॉग-इन केल्यावर पेज उघडेल, तिथे दिसणाऱ्या ब्लू स्ट्रिपवर प्रोफाइल सेटिंग निवडा.
- प्रोफाइल सेटिंगमध्ये आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. त्याला सिलेक्ट करा. 
- तेथे देण्यात आलेल्या सेक्शनमध्ये आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
- माहिती भरल्यावर खाली दिसणाऱ्या 'लिंक आधार' ऑप्शनवर क्लिक करा.

 

 

एसएमएसद्वारेही करु शकता लिंक
एसएमएसद्वारेही तुम्ही पॅनला आधारशी लिंक करु शकता. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितले की 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून आधारला पॅनशी लिंक करता येईल.
 

बातम्या आणखी आहेत...