आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक साक्षरतेत ५०% सरकारी कर्मचारी सरासरी दर्जाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आर्थिक साक्षरतेच्याबाबत भारतीय खूपच कमजोर आहेत. कधी, कुठे, किती, कशी गुंतवणूक करावी याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. यातून सरकारी कर्मचारीदेखील सुटलेले नाहीत. निवृत्तिवेतन रेग्युलेटरी पीएफआरडीएच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे अर्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा आर्थिक साक्षरतेचा स्तर सरासरी दर्जाचा असल्याचे समोर आले आहे.

पीएफआरडीएच्या मतानुसार सर्व्हेमध्ये समावेश असलेल्या ४८ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचा आर्थिक साक्षरतेचा स्तर सरासरी होता. इतकेच नाही तर, २४ टक्के लोकांना या बाबतची खूपच कमी माहिती आहे. यात फक्त २८ टक्के कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसंदर्भात चांगली माहिती असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणात १०,१११ लोकांशी चर्चा करण्यात आली. यामध्ये केंद्र सरकार आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या ५,०७५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या ५,०३६ कर्मचाऱ्यांना आर्थिक साक्षरतेबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्व्हेमध्ये समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेबाबत (एनपीएस) प्रश्न विचारण्यात आले. आर्थिक स्वाक्षरतेबाबत केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या संदर्भातील लोक सर्वात पुढे होते. त्यानंतर केंद्र सरकारी कर्मचारी होते. तिसऱ्या क्रमांकावर राज्याच्या स्वायत्त संस्थांचे कर्मचारी आणि सर्वात शेवटी राज्य सरकारी कर्मचारी होते.

वयानुसार पैशांबाबतची माहिती वाढते
जसजसे वय वाढत जाते, तसतसे लोकांची पैशाच्या बाबतची माहिती वाढत जात असल्याचे सर्व्हेमध्ये समोर आले आहे. सर्वात कमी साक्षरता १८ ते २५ वयात येते. ३५ वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेले याबाबत समजूतदार निघाले. गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि पंजाब ही राज्ये यात आघाडीवर आहेत.

देशातील ७६ % लोकांना आर्थिक माहिती
मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी गॅलपच्या एका अहवालानुसार भारतातील ७६ % वयस्करांना आर्थिक व्यवस्थापनाबाबत जास्त माहिती नाही. जागतिक पातळीवर विचार केल्यास दोन तृतीयांश वयस्कर व्यक्ती आर्थिक स्वरूपात साक्षर नाहीत. पूर्ण आशियात ही पातळी तीन चतुर्थांश आहेत. गॅलपने या सर्व्हेमध्ये १४० देशांमधील सुमारे दीड लाख लोकांशी चर्चा केली. यात आशियात सर्वात जास्त सिंगापूर (५९%) मधील वयस्क आर्थिक स्वरूपात साक्षर आहेत.
बातम्या आणखी आहेत...