आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरसंचार दंडाचा निर्णय योग्य : महाधिवक्ता, एअरटेल, व्होडाफोन, आयडियाला भरावे लागणार 3,050 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल, व्होडाफोन तसेच आयडिया सेल्युलरवर लावण्यात आलेला  ३,०५० कोटी रुपयांच्या एकूण दंडाचा रस्ता मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे. देशाचे महाधिवक्ता यांचा या संदर्भात सल्ला मागवण्यात आला होता. त्यांनी दूरसंचार विभागाला असा दंड लावण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुणवत्ता तसेच सेवेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असेल, तर अशा कंपनीवर दंड लावण्याचा अधिकार दूरसंचार विभागाला असल्याचे महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  
यासंदर्भात कंपनीच्या वतीने ट्राय तसेच दूरसंचार विभागाला पत्र लिहिले असल्याचे एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले आहे. ट्रायच्या शिफारशींवर विचार करण्यासाठी दूरसंचार विभागाने समिती बनवली असून या समितीच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे मित्तल यांनी सांगितले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने एअरटेल तसेच व्होडाफोनवर १,०५० - १,०५० कोटी रुपयांचा, तर आयडियावर ९५० कोटी रुपयांचा दंड लावण्याची शिफारस केली होती. रिलायन्स जिओने तक्रार केल्यानंतर या कंपन्यांवर दंड लावण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...