आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारामुळे व्यवसायात तोटा; प्रचारातील आरोप-प्रत्यारोपामुळे बाजारातील वातावरण खराब झाल्याचा कंपन्यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - निवडणुकीच्या प्रचारामुळे टीव्ही-फ्रिजची विक्री कमी होऊ शकते का? लाेकांचे कॉफी हाऊसमध्ये जाणे कमी होऊ शकते का? अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांनीच्या वतीने मात्र असेच मत व्यक्त केले आहे. महिनाभरात अमेरिकेतील सुमारे ८० मोठ्या कंपन्यांची आकडेवारी खराब जाहीर झाली आहे. याचे कारण विचारल्यावर या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालकांनी हिलरी क्लिंटन तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकांवर लावलेल्या आरोपांमुळे बाजारातील वातावरण खराब झाले असल्याचे सांगितले.

गृहोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी व्हर्लपूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ फेटिग यांनी सांगितले की, निवडणुकीवर सर्व लक्ष केंद्रित असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी झाला आहे. यामुळे कंपनीची विक्री अर्धा टक्क्याने घटली आहे. याचप्रमाणे कमीत कमी पगार तसेच इतर नियमांची चर्चा वाढली असल्यामुळे नवीन स्टोअर सुरू झालेले नसल्याचे डंकिन ब्रँड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाइजेल ट्रेव्हिस यांनी सांगितले. फर्निचर समूह एथन एलेन, स्टाफिंग संस्था रॉबर्ट हाफ इंटरनॅशनल तसेच हॉटेल ऑपरेटर हिल्टन वर्ल्डव्हाइडनेदेखील निवडणुकीमुळे महसुलात तूट झाल्याचे सांगितले.

या पुढील काळातही मंद गतीने विकास होण्याची शक्यता हिल्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफर नसेटा यांनी व्यक्त केली. निवडणुकीमुळे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मंदी आली असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ग्राहकी खर्चात घट नोंदवण्यात आली आहे.

डॉलर मजबूत, सोने घसरले
अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. ई-मेल प्रकरणात हिलरींना क्लीन चिट दिल्यामुळे डॉलर मजबूत झाला आहे. त्यामुळे सलग चार दिवसांपासून सोन्यातील तेजीला ब्रेक लागला आहे. जागतिक संकेतामुळे सोमवारी सोने ३०० रुपयांच्या घसरणीसह ३१,००० रुपये प्रतिदहा ग्रॅमच्या पातळीच्या खाली ३०,८५० रुपयांवर आले आहे. तर चांदीमध्येदेखील ४५० रुपये प्रतिकिलो ग्रॅमच्या घसरणीसह ४३,६०० रुपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहोचले आहेत. या बातमीमुळे लंडन हाजिर बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. येथे १८.६५ डॉलरची घसरण दिसून आली.
आऊटसोर्सिंगवर ३५ टक्के कर लावण्याचा ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन | रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्पवर तंत्रज्ञानावर आधारित कंपनी अायबीएमवर भारताला व्यवसाय देण्यासाठी अमेरिकेत कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचा आरोप लावला आहे. एका सभेत ते म्हणाले की, आयबीएमने मिनिपोलिसमध्ये आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. येथील काम कंपनीने भारत तसेच इतर देशांना दिले आहे. मी राष्ट्रपती झाल्यानंतर यावर बंदी घालेल. एखाद्या कंपनीने आपला व्यवसाय बंद केला, आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आणि पुन्हा इतर देशात प्रकल्प लावून येथून उत्पादन भारतात निर्यात केले तर अशा कंपन्यांवर ट्रम्प प्रशासन ३५ टक्के कर लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिलरींना क्लीन चिट मिळाल्याने आशिया, युरोपीय बाजारात तेजी
मुंबई | डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटनला ई-मेल प्रकरणात एफबीआयने क्लीन चिट दिल्यानंतर सोमवारी भारतासह आशिया आणि युरोपातील शेअर बाजारात तेजी आली. सेन्सेक्स १८४.८४ अंकांनी म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी वाढून २७,४५८.९९ च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टी ६३.३० अंकाच्या वाढीसह ८,४९७.०५ वर बंद झाला. या आधी सलग पाच दिवसांपासून निर्देशांकात घसरण सुरू होती. या दरम्यान सेन्सेक्समध्ये ६६७.३६ अंकांंची घसरण झाली होती. सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प पुढे असल्याचे वृत्त आल्यामुळे गेल्या आठवड्यात जगभरातील सर्व प्रमुख देशांच्या शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...