आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article About How Your PPF Account Works And Its Benefits

पीपीएफमध्ये ५ तारखेपूर्वी पैसे जमा केल्यास त्या महिन्याचे व्याज मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्केटमध्ये विविध प्रकारची गुंतवणुकीची साधने आहेत. करात सवलतीसाठी कोणतीही व्यक्ती अनेक पर्यायांवर विचार करते. अनेक वेळा तो चुकीच्या स्कीम्स किंवा गुंतवणुकीत गुरफटला जातो; परंतु पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)वर मात्र तो विश्वास ठेवू शकतो. जर गुंतवणूकदाराची बराच काळ थांबण्याची तयारी असेल तर याचा परतावासुद्धा तितकाच चांगला व करमुक्त असतो.
प्रत्येक व्यक्ती आपला कर वाचवण्याचा प्रयत्न करते. आयकर कायद्याच्या ८० सी नुसार जितकी सूट दिली जाते, त्या मर्यादेपर्यंत गुंतवणूक करून कर वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रामुख्याने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आदींचा समावेश आहे. यात पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (पीपीएफ) सर्वात चांगला पर्याय आहे. या योजनेला कर वाचवण्यासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत पहिली पसंती दिली जाते. कारण यात गुंतवणूक करण्याचा अवधी कमी आहे. शिवाय कर लागत नाही. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या वर्षी पीपीएफ भरला नाही तर तो बंद पडत नाही.

याची वैशिष्ट्ये जाणून घ्या-
- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे करात सवलत मिळते.
- यापासून मिळणाऱ्या व्याजावर कर लागत नाही.
- अवधी पूर्ण झाल्यानंतरही कर लागत नाही.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय?
यात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करता येते. यात पैसे पूर्णत: सुरक्षित राहतात. हा एखाद्या कंपनीकडे नसून सरकारकडे असतो. यावर द पब्लिक प्रॉव्हिडंट फंड कायदा १९६८ लागू असतो. पीपीएफ अकाउंटमधील रक्कम कोणत्याही कोर्टात दाखल झालेल्या कर्जवसुलीसाठी किंवा देणेकरी म्हणून जप्त करता येत नाही.

पीपीएफचे कार्य
पीपीएफचे पोस्ट आॅफिस किंवा बँकांमध्ये खाते उघडता येते. हे जॉइंट अकाउंटच्या स्वरूपात उघडता येत नाही. यात वारसदारांचे नाव देणे आवश्यक असते. पीपीएफ १८ वर्षांखालील मुलांसाठीही काढला जाऊ शकतो. मुलांचे आईवडील या खात्याद्वारे आयकर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. एचयूएफ (अविभाजित हिंदू परिवार), अनिवासी भारतीय (एनआरआय) यांना पीपीएफ खाते उघडता येत नाही.

लॉक इन अवधी
जर तुम्ही १ नोव्हेंबर २००० रोजी खाते उघडले असेल तर याचा अवधी ३१ मार्च २०१६ पर्यंत संपतो. प्रत्येक वर्षी या खात्यात कमीत कमी ५०० रुपये जमा करावे लागतात. ही गुंतवणूक सातत्याने केली पाहिजे. यात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करता येतात. यात कोणीही व्यक्ती एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या हप्त्यांत पैसे जमा करू शकतो. वर्षात जास्तीत जास्त १२ हप्त्यांत पैसे भरता येतात. निवृत्त होण्यास १५ वर्षे शिल्लक असताना पैसे जमा करणे सुरू केल्यास चांगली रक्कम मिळते.

या उदाहरणावरून समजून घ्या
राज यांनी १ एप्रिल २००१ ला पीपीएफ खाते उघडले. हे खाते ६० हजारांपासून सुरू केले. दरवर्षी एक एप्रिलला ६० हजार रुपये जमा करत होता. त्याचा अवधी पूर्ण होत आला. त्यांना यावर्षी ८.७ टक्के व्याजदराने २० लाख ९८ हजार ३०८ रुपये २० पैसे इतकी रक्कम मिळेल. येथे हे लक्षात घ्या - महिन्याचे व्याज तेव्हाच जमा होईल जेव्हा पीपीएफ खात्यात दर महिन्याच्या ५ तारखेस पैसे जमा होतील. यासाठी दर महिन्यास ५ तारखेच्या अाधी पैसे जमा करावे लागतील.

जर यात पैसे ३ मे रोजी जमा केले तेव्हा मे महिन्याचे व्याज यात मिळेल. समजा, जर तुम्ही यात ६ तारखेस किंवा कोणत्याही महिन्याच्या ६ तारखेस पैसे जमा केले तर त्या महिन्याचे व्याज पुढच्या महिन्यात दिले जाईल. यामुळे एक महिन्याच्या व्याजाचे नुकसान होईल. यासाठी कोणत्याही परिस्थितीत ५ तारखेपूर्वी पैसे बँकेत जमा करावे लागतील.

कर्जाची सवलत
पीपीएफवर कर्ज मिळण्याची सुविधा एक वर्षाचा अवधी पूर्ण झाल्यानंतरच मिळते. त्याचबरोबर ५ वर्षांनंतरच ही कर्जाची सुविधा मिळते. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी जमा केलेली रक्कम जितकी असेल त्याच्या २५ टक्के रक्कम कर्जाच्या रूपात दिली जाते.

उदाहरणार्थ
- राजने १-०४-२००१ ला पीपीएफ खाते उघडले. या पद्धतीने तो २००३ मध्ये पीपीएफवर कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो; परंतु केवळ २००७ पर्यंत तो कर्ज घेऊ शकतो.
- राज याने २००३ मध्ये कर्जासाठी अर्ज केला. त्याला २००१ च्या शिलकीवर २५ टक्के व्याज मिळेल.
- २००४-०५ मध्ये २००२ -०३ च्या शिलकीवर २५ टक्के रक्कम कर्जाऊ मिळेल.
- २००५-२००६ मध्ये २००३-०४ च्या शिलकीपैकी २५ टक्के कर्ज मिळेल.
- २००६ -०७ मध्ये २००४-०५ च्या शिलकीवर २५ टक्के कर्ज मिळेल. येथे पीपीएफला सुरू करून ४ वर्षे पूर्ण झालेली असतात.

पीपीएफमधून मुदतीपूर्वीच पैसे काढणे
पीपीएफ खात्यात कोणतीही व्यक्ती वर्षातून एकदाच पैसे काढू शकते. पाच आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंशत: यातून रक्कम काढता येते. त्याचबरोबर यातील काढलेली रक्कम ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. अशा प्रकारे राज २००७ -०८ मध्ये काही पैसे काढू शकला असता.
राजला ३ मे २००७ रोजी काही पैसे काढावयाचे झाल्यास त्याच्या पीपीएफमध्ये ३१-०४-२००७ ला ८० हजार रुपये होते. आणि ३१-०४-२००४ ला ५० हजार रुपये होते. तो ३ मे २००७ ला २५ हजार रुपये काढू शकतो.
पीपीएफवर व्याज
भारत सरकारने पीपीएफवर एप्रिल महिन्यात व्याजाचा दर घोषित केला आहे. हे व्याज सरकारच्या १० वर्षांच्या बाँडच्या परताव्याशी संबंधित असते.
पीपीएफ रिटर्न = १० वर्षे सरकारी रोख्याचा परतावा + १ टक्का
पीपीएफवर परतावा
२०१३ -२०१४ - ८.७%
२०१२-२०१३ - ८.८%
(लेखिका सेबीच्या अधिकृत गुंतवणूक सल्लागार, फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड ऑफ इंडियाच्याा सदस्या.)