आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडच्या निर्णयावर ठरेल बाजाराची दिशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार चढ-उतारानंतर कन्सोलिडेशनच्या टप्प्यात पोहोचला होता. अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या आधी या निकालावर बाजाराचे बारीक लक्ष होते. या बैठकीत फेड व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे बाजारामध्ये आधीच संमिश्र व्यवहार दिसून आले.
या आधीच भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक पूर्ण झाली होती. यामध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरात ०.२५ टक्के कपात करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, बँकेने रिझर्व्ह रेपो दरात कोणताच बदल केला नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण होते.
महागाईत वाढ होण्याची चिंता आणि जागतिक बाजाराची स्थिती पाहता रेपो रेट ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला, तर नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याचीही शक्यता आहे. अनेक विश्लेषकांनी या वेळी ०.२५ टक्के व्याजदर कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय धक्कादायक होता.
धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आर्थिक आकड्यांवर जास्त लक्ष देण्याची अावश्यकता असल्याचे मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले. तसेच नोटाबंदीमुळे चलनाची कमतरता लवकरच भरून निघण्याची अपेक्षाही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. मेरिकेत व्याजदरात वाढ झाल्यास विकसनशील देशांच्या बाजारात घसरण होण्याची चिंताही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. याप्रमाणे रिझर्व्ह बँकेकडून गुंतवणूकदारांना निराशा मिळाली.
आता फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली तर बाजारात पुन्हा एकदा घसरण दिसण्याची शक्यता आहे. अनेक विश्लेषकांनी अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अमेरिकी शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहे. तेथील बाजारात नफारूपी विक्रीचा मारा सुरू आहे. तेथील अर्थव्यवस्थेची सर्व आकडेवारी सकारात्मक असल्याने व्याजदरात वाढ होण्याची शक्यताही जास्त आहे.

पुढील काळात बाजारात वादळापूर्वीची शांतता दिसण्याची शक्यता आहे. मात्र, फेडरल रिझर्व्हचा निकाल येताच बाजारात तेजीने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम बाजाराने आधीच गृहीत धरला असल्याने बाजारात जास्त घडामोडी दिसण्याची शक्यताही कमीच आहे. मंगळवारी निफ्टी ८२२१.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.
तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला ८१५४ च्या पातळीवर आधार, तर ८२८६ च्या पातळीवर रेझिस्टन्स आहे. या दोन्ही पातळ्या मजबूत आहेत. जर निफ्टी ८१५४ च्या पातळीच्या खाली आला, तर त्याला पहिला आधार ८०५९ च्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. त्यानंतर त्याला ७९३६ च्या जवळपास मजबूत आधार मिळेल. जर निफ्टी ८२८६ च्या वरती गेला तर ८३९७ अंकांपर्यंत वाढ मिळवू शकतो. हा निफ्टीसाठी मजबूत रेझिस्टन्स असेल.

शेअरमध्ये या आठवड्यात डिश टीव्ही आणि एचडीएफसी बँक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. डिश टीव्हीचा सध्याचा बंद भाव ८६.३० रुपये असून तो ९० रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत याला ८२ वर स्टॉपलॉस लावावा. एचडीएफसी बँकेचा सध्याचा बंद भाव १,१८६.२५ रुपये असून तो १,२०८ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत याला १,१६२ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा.
-लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
विपुल वर्मा
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...