आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्टॉकशी विवाहबद्ध होऊ नका’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इक्विटी नेहमीच दीर्घकाळासाठी खरेदी केल्या जातात आणि नेहमीच मनात विशिष्ट लक्ष्य ठेवले जाते. दीर्घकालीन म्हणजे ३ ते ५ वर्षे. कालावधी जितका जास्त असेल तितके चांगले. एक तर, तुमच्याकडील जास्तीची रक्कम तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार विविध संपत्तीवर्गामध्ये विभागायला हवी, जसे की, निश्चित व्याज देणारी साधने, रिअल इस्टेट व इक्विटी.
>गुंतवणुकीचे व्यवस्थापन द्यावे :
विभाजनाबाबत निर्णय घेऊन झाला की, इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधण्याचा विचार करावा. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, तुम्हाला इक्विटीची समीकरणे लक्षात येत नसतील तर म्युच्युअल फंडासारख्या प्रोफेशनलना तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यास द्यावे. फंड मॅनेजर विशिष्ट शेअर्स खरेदी करण्याबद्दल निर्णय घेत असलेल्या लार्ज कॅप डायव्हर्सिफाइड फंड असलेल्या म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक केली तर जीवन सुलभ होऊन जाते. यासाठी योजनांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आवश्यक. वेळोवेळी योग्य ती कृती करायला हवी. कामगिरीची तुलना विविध स्वतंत्र वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीशी करता येईल. सर्व लार्ज एमएफकडे योजना असतात ज्या लार्ज कॅप व स्मॉल कॅप, सेक्टर फंड गुंतवणूक करतात.
{डायरेक्ट इक्विटींचा विचार करू.
शेअर्समध्ये गुंतवणूकीाविषयी निर्णय घ्यायला आवडेल, चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.
१. व्यवसाय, वाढ आणि मूल्यमापन या बाबतीत स्टॉकचा मागोवा घेण्यासाठी आणि समजून घेणे यासाठी तुम्ही वेळ व ऊर्जा देणे गरजेचे आहे. आजकाल, माहिती मोकळेपणे उपलब्ध असते आणि तुम्ही ब्रोकरेज रिपोर्टची मदत घ्यावी आणि त्या कंपनीविषयी वैयक्तिक निष्कर्ष काढावेत.
२. तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करायचा असेल, वैविध्य आणणे गरजेचे आहे. “सगळी अंडी एका बास्केटमध्ये ठेवू नये” हे पूर्वापार सांगणे लक्षात घ्यावे. स्टॉकची संख्या किमान पाचअसावी आणि वीसपेक्षा अधिक असू नये. मागोवा घेणे कठीण ठरते. तसेच, कोणत्याही स्टॉकमध्ये वा क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक असावी, याविषयी तुम्हाला निर्णय घेता येईल. विशिष्ट कंपनी वा क्षेत्राशी संबंधित असलेली जोखीम अपेक्षित नसेल तर तुमची जोखीम विभागायला हवी.
३. लहान व मध्यम कंपन्या वि. मोठ्या कंपन्या यामध्येही गुंतवणूक विभागायला हवी. लार्ज कॅपमधून साधारणतः (नेहमी नाही) इंडेक्सची हालचाल प्रतित होते आणि लहान व मध्यम कंपन्यांचे शेअर्सही मोठे होण्याची मोठी संधी असते. गेल्या १२ महिन्यांतील ट्रेंड पाहिल्यास, लहान व मध्यम कंपन्यांनी मोठ्या कंपन्यांपेक्षा मोठे मार्जिन ठेवून उत्तम कामगिरी केली आहे. लार्ज कॅपमध्ये ६० टक्के गुंतवणूक करावी आणि लहान व मध्यम कंपन्यांमध्ये ४० टक्के गुंतवणूक करावी, असे मला वाटते. कमी मूल्यांकन झालेल्या बहुतांश चांगल्या स्टॉकनी अगोदरच चांगली कामगिरी केलेली असल्याने लक्षणीय सावधगिरी बाळगायला हवी आणि उत्पन्न व नफ्यातील वाढ या बाबतीतील कामगिरीवर भविष्यातील किमती आधारित असतात.
४. काही दशकांपूर्वी, आपण हिंदुस्तान लिव्हर वा नेस्ले वा कोलगेट वा अशा ब्लु चिप कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकलो, त्यांना कपाटात ठेवून दिले आणि ही बाब विसरून गेलो. पाच वा दहा वर्षांनी, त्या अजूनही ब्लु चिपच आहेत. आजच्या अनेक स्टॉकनाही हे लागू होणार नाही. मला वाटते, “स्टॉकशी विवाहबद्ध होऊ नका”. आपल्याकडे असलेल्या स्टॉकच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
>नोंदणीकृत ब्रोकरमार्फत गुंतवणूक शेवटचे, पण महत्त्वाचे, नोंदणीकृत ब्रोकर वा सब ब्रोकरमार्फत गुंतवणूक करावी. काँन्ट्रॅक्ट नोट्स तपासणे, वेळेवर पेमेंट करणे आणि विशिष्ट काळाने तुमची डीपी होल्डिंग स्टेटमेंट तपासणे आठवणीने करावे. सध्या, बहुतांश ब्रोकरकडे या सर्व गोष्टी ऑनलाइन करण्याची आणि अगदी मोबइलवरही करण्याची सुविधा असते.

ट्रेडिंग पोर्टफोलिओ, स्टॉप लॉस
लहान प्रमाणात काही काळ स्टॉकचा संचय करणा-या दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी वेळ महत्त्वाची असते, असे मला वाटत नाही. सर्वात कमी किमतीला खरेदी करणे आणि सर्वात जास्त किमतीला विक्री करणे कधीच शक्य नसते. भविष्यातील किमतीसाठी चांगले फंडामेंटल असलेले स्टॉक करण्याचा प्रयत्न करायला हवा. गुंतवणूकदारांची सर्वसाधारण मानसिकता खरेदी केल्यानंतर स्टॉकच्या किमती खाली गेल्या तर भयभित होण्याची आणि त्यानंतर नुकसान ओढवून घेण्याची असते. ट्रेडिंग पोर्टफोलिओच्या बाबतीत स्टॉप लॉस असणे चांगले असले तरी दीर्घकालीन पोर्टफोलिओच्या बाबतीत तुमचा निश्चय महत्त्वाचा ठरतो. त्याच वेळी, तुमचा निर्णय चुकतो आहे, असे तुमच्या लक्षात आले तर तातडीने नुकसान बुक करणे आणि पुढे जाणे योग्य ठरते. मिळवलेल्या नफ्यावर अनेक जणांना मर्यादा असते, पण नुकसानावर कोणतीही मर्यादा नसते आणि त्यामुळे ते किंमत सावरण्यासाठी वाट पाहत राहतात. वेळ कदाचित विचारात घ्यावी - प्रामुख्याने विक्री करताना व ३६५ दिवस जवळ आल्यावर, ज्यामुळे तुम्हाला भांडवली नफा कर टाळायला मदत होऊ शकेल.
पेड अप शेअर
प्रतिशेअर किंमत महत्त्वाची नाही, आज आपल्याकडे एक रुपया वा दाेन रुपये आणि दहा रुपये आहेत आणि अशा प्रकारचे सर्व पेडअप शेअर्स. हे लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. एक रुपयाचा शेअर पेडअप दहा रुपयांनी व्यवहार करणे म्हणजे १० रुपयांच्या पेड अप शेअरने १०० रुपयांवर व्यवहार करण्यासारखे आहे. त्यामुळे रुपये मूल्याचा शेअर १०० रुपये मूल्याच्या स्टॉकपेक्षा योग्य ठरतो. तसेच, प्रतिशेअर किंमत स्टॉकच्या गुणवत्तेनुसार आणि भविष्यातील उत्पन्नानुसार वेगळी होते आणि त्यामुळे तीच पेड अप किंमतही. ५० रुपये मूल्य असलेला स्टॉक १०० रुपये मूल्य असलेल्या स्टॉकपेक्षा हलका असेल, असे नाही.
उच्च जोखीम उच्च परतावा
गुंतवणुकीसाठी ज्ञान, वेळ, प्रयत्न आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही साधारणतः प्रतिशेअर उत्पन्न, प्रतिशेअर किंमत, कॅश ईपीएस (सीईपीएस) आणि लाभांशाची परंपरा हे घटकही स्टॉकची निवड करताना विचारात घ्यावेत. गुंतवणूक करताना ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवण्याची मानसिकता टाळावी, याचा अर्थ, केवळ तुमच्या शेजा-याने अमुक स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यामुळे पैसे कमावले म्हणून तुम्ही त्याच स्टॉकचा विचार करावा आणि ते खरेदी करावे, असे नाही. पोर्टफोलिओ तयार करताना भावनांना स्थान नसते. हृदयापेक्षा बुद्धीला महत्त्व द्यावे. लक्षात ठेवा, स्टॉक हे उच्च जोखीम उच्च परतावा गुंतवणूक साधन आहे.
*लेखक हे कार्यकारी संचालक, जिओजित बीएनपी पॅरिबा आहेत