आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ग्रॅज्युएशनपूर्वी जॉब वा इंटर्नशिप आहे लाभदायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील जॉबचे पर्याय, स्टार्टअप आणि मास्टर डिग्री प्रोग्राम वाढण्यासह विद्यार्थ्यांसमोर पदवीनंतर एकाहून अधिक पर्याय झाले आहेत. अधिक पर्याय होण्यासह योग्य निवड करणे विद्यार्थ्यांसाठी कठीण होऊन जाते. विद्यार्थ्यांना जॉब, हायर एज्युकेशन वा अापल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यात द्विधेचा सामना करावा लागू शकतो. माझ्या संशोधनानुसार भारतात अंडरग्रॅज्युएट कोर्स करणारे ३५ हजार कॉलेजेस आहेत, ज्यातील अधिकांश महाविद्यालये वा संस्थांकडे अधिकृत प्लेसमेंट सेल नाही. याच्या परिणामामुळे अधिकांश विद्यार्थी पुढील अभ्यास करण्याचा पर्याय निवडू शकतात. जॉबची शक्यता पाहता चांगल्या पर्यायांची कमीच आहे. सामान्यत: विद्यार्थी उत्तम जॉबसाठी एमबीए कोर्स प्रवेशाला प्राधान्य देतात. पण शोधात या गोष्टी समोर येऊन चुकल्या आहेत. भारतात फक्त ७ टक्के एमबीए ग्रॅज्युएटच रोजगाराच्या पात्रतेचे आहेत. देशात दरवर्षी ७० लाख विद्यार्थी पदवीधर असल्याचा काय फायदा होतो? जर आपण पदवीधर झालेले आहात वा होणार आहात आणि भविष्यातील मार्ग निवडीबाबत द्विधा आहात तर हे मुद्दे आपली निवड योग्य करण्यात आपली मदत करू शकतात.

जॉब करणे : जॉब आपल्याला हे शिकविण्याची संधी प्रदान करतो की, कंपन्यांत काम कसे होते आणि कंपनी कोणत्या प्रकारे काम करते. नोकरीचा अनुभव आपल्याला पुढील शिक्षणातही कामी येतो. यामुळे चांगल्या संस्थांमध्ये प्रवेशाच्या वेळी महत्त्व दिले जात आहे. कामाच्या दरम्यान नेटवर्क बनविण्यातही मदत मिळते आहे, जी आपल्याला पर्सनल आणि व्यावसायिक विकासासाठी साहाय्यकारी ठरू शकते. पदवीनंतर जॉब करून व्यावहारिक अनुभव तर वाढतोच यासह उच्च शिक्षणात होणाऱ्या खर्चातही बचत होत आहे.

उच्च शिक्षणाचा पर्याय निवडणे : आपण सुनिश्चित आहात अन् कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर बनवू इच्छिता तेव्हा पदवीनंतर उच्च शिक्षणाची निवड आपल्या ज्ञानाला अधिक उत्तम बनवील. आपण आपल्या क्षेत्रात शिक्षणाचा आनंद घेत आहात तेव्हा यात स्पेशलायझेशनदेखील मिळवू शकता आहात. विदेशात कोणत्याही चांगल्या विद्यापीठात शिकण्याचा पर्यायही उत्तम लोकांशी मिळण्याची संधी घेऊनच येतो.

आंत्रप्रेन्योरशिपचा पर्याय : तुमच्याकडे चांगले सल्लागार आहेत अाणि कोणत्याही समस्येला सोडविण्याच्या उत्तम कल्पना आहेत तेव्हा उद्योजकता आपण निवडू शकता. यासह ही जोखीम घेण्यासाठीही तयार राहावे लागेल. आपला व्यवसाय सुरू करणे कठीण असले तरी चांगल्या नफ्याचे मार्ग आहेतच. आपल्या आवड वेडाला आपण एका चांगल्या व्यवसायात बदलू शकता.
श्वेता रैना
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या पदवीधर आणि टेलिरंग.कॉमच्या सीईओ.
बातम्या आणखी आहेत...