आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम झाले ‘कॅशलेस’, ‘लोकल सर्कल्स’च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या पाच महिन्यांनंतरही देशभरातील एटीएममध्ये कॅशची प्रचंड टंचाई आहे. ‘लोकल सर्कल्स’ने केलेल्या सर्व्हेत एटीएममधील कॅशची स्थिती जानेवारी आणि फेब्रुवारीत काहीशी सुधारली होती. एप्रिलपर्यंत ती आणखी खालावली आहे. या सर्व्हेत देशभरातील ८,७०० नागरिकांनी सहभाग घेत आपल्या भागातील एटीएमवर आलेले अनुभव मांडले.

४३ टक्के नागरिकांनुसार १३ ते १६ एप्रिलदरम्यान एटीएममधून त्यांना कॅश मिळाली नाही. 5 ते 8 एप्रिलदरम्यान हा आकडा ३६ टक्के होता. सर्व्हेनुसार, आरबीआयने १३ मार्चला एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा हटवल्यामुळे लोकांनी बँकेऐवजी एटीएममधूनच मोठ्या रकमेत पैसे काढण्यास पसंती दिली. यामुळे बँकांना आपल्याकडील रोकडतेचे प्रमाण राखता आले नाही. परिणामी एटीएममध्ये पुरेशी कॅश उरलीच नाही. नोटाबंदीचा परिणाम या पुढील काळातही कायम राहणार असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
 
शुल्काच्या भीतीपोटी मोठ्या रकमांचे विड्रॉवल
- काही बँकांनी सुरुवातीच्या चार मोफत व्यवहारांनंतर एटीएममधून कॅश काढण्यावर शुल्क लावले आहे. यामुळे लोक या चार व्यवहारांतच मोठ्या रकमा विड्रॉवल करत आहेत.
- काही बँक अधिकाऱ्यांनुसार कॅश प्रिंटिंग प्रेसमधून करन्सी चेस्टपर्यंत नोटांचा पुरवठा थंडावल्यामुळेही टंचाईत भर पडली आहे.

हैदराबाद, पुण्यात रोकड रकमेची सर्वाधिक चणचण
- सर्व्हेनुसार देशभरातील टंचाईग्रस्त ११ शहरांपैकी हैदराबाद आणि पुण्यात सर्वाधिक रोकड रकमेची चणचण जाणवत आहे. ते एप्रिलदरम्यान हैदराबादेतील ८३ टक्के तर पुण्यात ६९ टक्के एटीएममध्ये टंचाई होती.
- दिल्लीच्या एटीएममध्ये सर्वात जास्त कॅश होती. येथे केवळ ११ टक्के लोकांनाच एटीएममधून पैसे मिळू शकले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...