नवी दिल्ली- साधारणपणे बचत खात्यावरील (Saving account) जमा रकमेवर बॅंक 4 टक्के दराने व्याज देते. मात्र, बॅंक तुमच्या बचत खात्यावर दुप्पट अर्थात 8 टक्के दराने व्याज देत असेल तर, आहे ना फायद्याचा सौदा. बचत खातेदारांना बॅंक फिक्स्ड डिपॉझिटच्या (एफडी) दराने व्याज देणारी स्कीम आणली आहे.
'ऑटो स्वॅप स्कीम' असे नाव असणार्या स्कीमच्या माध्यमातून खातेदारांना हा लाभ मिळेल. ही सुविधा घेतल्यानंतर
आपल्या बचत खात्यात जमा रक्कम एफडीसारखे काम करेल.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला 'ऑटो स्वॅप स्कीम'विषयी माहिती देत आहोत.
असे काम करते ही स्कीम...
बॅंकद्वारे बचत खात्यावर फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे व्याज देण्यासाठी 'ऑटो स्वॅप स्क्रीम'ची ऑफर दिली जाते. या स्कीमला 'फ्लेक्सी डिपॉझिट स्कीम' असेही म्हटले जाते. ही स्कीम घेतल्यानंतर आपल्या बचत खात्यावरील जमा रकमेवर एफडीप्रमाणे व्याज मिळते. या स्कीमनुसार आपल्या बचत खात्यावरील जमा रकमेचा ठराविक भाग एफडीमध्ये ऑटोमेटिक रुपांतरीत होतो. उल्लेखनिय म्हणजे खातेदाराला पैशाची गरज भासल्यास एफडीची रक्कम ही बचत खात्यावरील जमा रकमेप्रमाणे वापरताही येते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, असा घ्या स्कीमचा लाभ...
(नोटः छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरणारसाठी करण्यात आला आहे.)