आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Axis Bank Cuts Base Rate By 20 Basis Points To 9.95%

अ‍ॅक्सिस बँकेचे गृह, वाहन कर्ज स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खासगी क्षेत्रातील देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या अ‍ॅक्सिस बँकेने कर्जाचे मूळ व्याजदर ०.२० टक्क्यांनी घटवले आहेत. आता बँकेचा बेस रेट ९.९५ टक्के झाला आहे. नवे व्याजदर १३ एप्रिलपासून लागू होतील. पूर्वी बँकेचा बेस रेट १०.१५ टक्के होता. बेस रेट घटवल्याने बँकेचे गृह, वाहन तसेच इतर कर्ज स्वस्त होणार आहे. बँकेने बेस रेटबरोबरच विविध प्रकारच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांना खडसावल्यानंतर मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेने कर्ज स्वस्त केले होते.