आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्ड स्वॅपिंगला पर्याय; पीओएस मशीनजवळ कार्ड नेताच व्यवहार होईल पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेने नव्या योजनेला उभारी देण्याची तयारी केली आहे. यानुसार कार्डने खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वॅप करण्याची आवश्यकता नाही, तर फक्त पीओएस मशीनला कार्ड टच करून तुम्ही खरेदी करू शकता. या सुविधेसाठी एसबीआयने डेबिट, तर आयसीआयसीआयने क्रेडिट आणि डेबिट दोन्ही कार्ड सादर केले आहेत.

बँकांसमोरील आव्हान
काँटॅक्टलेस कार्ड हे नव्या "फील्ड कम्युनिकेशन' तंत्रज्ञानानुसार काम करते. सध्या ते विदेशात वापरले जाते. भारतात या प्रणालीचा वापर करण्यासाठी आधी पीओएस मशीनला अपग्रेड किंवा नव्या पीओएस मशीन बसवाव्या लागणार आहेत. आरबीआयच्या पाहणीनुसार सध्या देशात १२ लाखपेक्षा जास्त पीओएस मशीन आहेत. या सर्वात बदल करावा लागणार आहे. आयसीआयसीआयने जानेवारीमध्ये १२०० पीओएस मशीनवर हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली होती. भारतीय प्लास्टिक कार्ड बाजारात सध्या एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेची ६० टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

कशी काम करेल प्रणाली?
सध्या तुम्ही कार्डने खरेदी करण्यासाठी पीओएस मशीनमध्ये कार्ड स्वॅप करतात. आता नव्या प्रणालीनुसार दुकानदार आधी व्यवहाराची रक्कम मशीनमध्ये टाकेल, त्यानंतर तुम्हाला तुमचे कार्ड पीओएस मशीनच्या सेंटिमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतराजवळ घेऊन जावे लागेल. अर्ध्या सेकंदातच तुमच्या खात्यातून पैसे कमी झालेले असतील. या व्यवहाराची माहिती माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर लगेचच मिळेल.

सुरक्षित आणि जलद खरेदी
यातंत्रज्ञानानुसार खरेदी करण्यासाठी बँकांनी नवे कार्ड बाजारात आणले आहेत. जे तुम्ही पीओएस मशीनजवळ घेऊन गेल्यास खरेदी व्यवहार होईल. यामुळे खरेदी व्यवहाराला वेग मिळेल. तसेच कार्ड स्वॅप करण्यापेक्षा हे जास्त सुरक्षित असल्याचे आयसीआयसीआय बँकेचे संचालक राजीव सबरवाल यांनी सांगितले.

एसबीआयने सादर केले डेबिट कार्ड
भारतीयस्टेट बँक (एसबीआय)ने "टच टॅप अँड गो' डेबिट कार्ड सादर केले आहे. या कार्डने दररोज ७५ हजार रुपयांची खरेदी करता येते. तसेच एटीएममधून दररोज ४० हजार रुपये काढता येतील. या कार्डसाठी दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला १५० रुपये शुल्क भरावा लागेल. १४ मेपासून या सुविधेला सुरुवात झाली.
बातम्या आणखी आहेत...