आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI च्या खातेदारांसाठी खुशखबर, ऑनलाइन बँकिंग 75% पर्यंत स्वस्त, 15 जुलैपासून मिळणार लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) गुरुवारी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्राॅस सेटलमेंट (आरटीजीएस) शुल्कात ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली. हा निर्णय १५ जुलैपासून लागू होईल. ही कपात इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगच्या व्यवहारांवर लागू होईल. 
- बँकेने देशभरात इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
- एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर (एनबीजी) रजनीश कुमार म्हणाले की, चार्जमध्ये केलेली कपात इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सर्व्हिसेसद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लागू असेल.
- भारताला डिजिटल इकॉनॉमी बनवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न आणि आमच्या धोरणांनुसार आम्ही हे पाऊल उचलल्याचेही ते म्हणाले.
 
IMPS वरून 1000 रुपयांच्या फंड ट्रान्सफरवर चार्ज नाही
- याआधी एसबीआयने इमीडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) च्या माध्यमातून 1000 रुपयांच्या फंड ट्रान्सफरवरील चार्ज काढले होते.
- बँकेने छोट्या रकमेसाठी डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले होते. यापूर्वी एसबीआय 1000 रु. पर्यंतच्या आयएमपीएस ट्रान्झॅक्शनवर 5 रुपये आणि सर्व्हिस टॅक्स चार्ज करत होती.
 
होस्टेलवर जीएसटी नाही : शैक्षणिक संस्थांच्या होस्टेल फीसवर कोणताही कर आकारला जाणार नाही, असे स्पष्टीकरण अर्थ मंत्रालयाने दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...