आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल वॉलेटमध्‍ये SBI नेट बँकिगने पैसे भरता येणार नाही, पेटीएम आणि मोबीक्विक ब्‍लॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसबीआयचे म्‍हणणे आहे की, नेट बॅकिंगने व्‍यवहार सुरक्षित नाही. - Divya Marathi
एसबीआयचे म्‍हणणे आहे की, नेट बॅकिंगने व्‍यवहार सुरक्षित नाही.
नवी दिल्‍ली - पेटीएम आणि मोबीक्विकसारख्‍या इतर मोबाईल वॉलेटमध्‍ये SBI नेट बँकिगने पैसे टाकणे आता शक्‍य होणार नाही. हा व्‍यवहार सुरक्षित नसल्‍याचे कारण देत स्‍टेट बँक ऑफ इंडियाने मोबाईल वॉलेटमध्‍ये पैसे भरण्‍याच्‍या सुविधेला बंद केले आहे. आता फक्‍त एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारा मोबाईल वॉलेटमध्‍ये पैसे भरता येणार आहेत. 
काय म्‍हटले एसबीआयने... 
 
- moneybhaskar.comला एसबीआयने सांगितले आहे की, नेट बँकिग व्‍यवहार सुरक्षित नाही. 
- सुरक्षित नेट बँकिग करण्‍यासाठी जे फिचर आवश्‍यक असतात, ते फिचर मोबाईल वॉलेटशी सुसंगत नाहीत. यामूळे मोबाईल वॉलेटने गैरव्‍यवहार करता येऊ शकतात. यासंबधात पेटीएमकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 
 
एसबीआयने दिले असुरक्षित व्‍यवहाराचे कारण 
- एसबीआयने म्‍हटले आहे की, ग्राहकांचे व्‍यवहार सुरक्षित होण्‍यासाठी, त्‍यावर देखरेख ठेवण्‍यासाठी आम्‍ही एक समिती स्‍थापित केली आहे. 
- समिती एसबीआय ग्राहकांतर्फे केल्‍या जाणाऱ्या सर्व प्रकारच्‍या व्‍यवहारामध्‍ये समाविष्‍ट असणाऱ्या संभाव्‍य धोक्‍यावर देखरेख ठेवते. 
- या समितीने मोबाईल वॉलेटने व्‍यवहार करणे सुरक्षित नसल्‍याचे सांगितले आहे. 
 
मोबाईल वॉलेटसाठी देशात नाही सुरक्षेचे मापदंड 
- भारतात मोबाईल वॉलेटसाठी सुरक्षेचे कोणतेही मापदंड नाहित. 
- याचे कारण आहे की, मो‍बाईल वॉलेट चालविणाऱ्या कंपन्‍यांची नोंदणी देशात नॉन बँकिग फायनान्शियल म्‍हणून झाली आहे. 
- यामुळे या कंपन्‍या रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाच्‍या अंतर्गत येत नाही. म्‍हणूनच आरबीआयला या कंपन्‍यांसाठी सुरक्षेचे मापदंड बनवता येत नाही. 
 
नोटबंदीनंतर वेगाने वाढतोय मोबाईल वॉलेटचा वापर 
- नोटबंदीच्‍या निर्णयानंतर देशभरात पेटीएम, मोबीक्विकसारख्‍या मोबाईल वॉलेटचा वापर वेगाने वाढत आहे. 
- चलनाच्‍या समस्‍येपासून मुक्‍तता मिळवियासाठी छोटे दुकानदार तसेच रिक्षाचालकांनीही पेटीएमद्वारे पेमेंट घेणे सुरु केले आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)    
 
बातम्या आणखी आहेत...