आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांतही सुरक्षित नाही आपला पैसा, SBI आणि ICICI बँकेत सर्वाधिक घोटाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई (डीएनएकडून साभार) - नागाराजू कोपुला हैदराबादेतील एक माजी पत्रकार. त्यांना २०१२ पासून फुप्फुसांचा कर्करोग आहे. मार्च रोजी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १.२३ लाख रुपये काढून घेण्यात आले. पैसे कोठे गेले, कोणालाच पत्ता नाही. बँकेकडून धोका झालेले नागाराजू एकमेव नाहीत.

माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या एका उत्तरात हे उघड झाले आहे. मागील पाच वर्षांत सरकारी आणि खासगी बँकांतील फसवणुकीमुळे ठेवीदारांचे २७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही प्रकरणे केवळ एक लाख रुपयांवरील ठेवींची आहेत. यापेक्षा कमी रकमेची प्रकरणे तर रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहोचतही नाहीत.

एसबीआयमध्येच पाच वर्षांत एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची फसवणूक झालेली १,१२४ प्रकरणे समोर आली आहेत. एकूण ३,४९४ कोटींच्या नुकसानीची. ही माहिती उघड झाली आहे रिझर्व्ह बँकेच्या खुलाशाने. डीएनएने माहितीच्या अधिकारात दिलेल्या अर्जाच्या उत्तराने. हे प्रकरण केवळ एसबीआयचे आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेतले. इतर सरकारी आणि खासगी बँकांतील फसवणुकीची ११,५०० प्रकरणे उघड झाली आहेत. एकूण २७ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीपैकी २४ हजार कोटी रुपयांची फसवणूक सरकारी बँकांतील आहे.

पेट्रोल पंप मालकाला १५ लाखांचा फटका
बांदा येथील संदीप डंढारिया यांनी अलाहाबाद बँकेत १६ मार्च रोजी १५ लाख रुपये जमा केले. एसएमएसद्वारे जमा झाल्याची माहिती मिळाली. सायंकाळी ट्रान्झेक्शन झाले नसल्याचा आणखी एक एसएमएस आला. बँकेत चौकशी केली तरी हेच उत्तर मिळाले. एफआयआर दाखल.

बँकांचा खुलासा
एसबीआय : प्रवक्त्यानेसांगितले, फसवणुकीच्या तक्रारी जास्त असू शकतात. मात्र रक्कम तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने फसवाफसवी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.

आयसीआयसीआय : बँकेला प्रश्न पाठवले. मात्र उत्तर मिळाले नाही. दुसर्‍या बँकांशी संपर्क झाला नाही.

आपले तंत्र अद्ययावत ठेवा : सन्याल
बँकांनी आपली व्यवस्था चोख ठेवायला हवी. लोकांनी सतर्क राहावे असा सल्ला देते. बँका एसएमएसद्वारे अलर्ट पाठवतात. त्याचा वापर करावा. ऑनलाइन पेमेंटमध्ये ओटीपी सुविधा फसवाफसवी थांबवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. - मीरा सन्याल, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या भारतातील माजी सीईओ अध्यक्ष

- आयसीआयसीआय बँकेत फसवणुकीची १७७६ प्रकरणे समोर आली. त्यात पाच वर्षांत १,०८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
- एसबीआयमध्ये पाच वर्षांत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीची १,१२४ प्रकरणे, त्यात ३,४९४ कोटींचे नुकसान