सॅन फ्रान्सिस्को- वेब मॅसेजिंग WhatsApp च्या कोट्यवधी यूजर्सला धोक्याची घंटा आहे. सुमारे 20 कोटी युजर्सच्या WhatsApp अकाउंट्सवरील माहिती हॅकर्सकडून चोरी होण्याची शक्यता कॉम्प्युटर सिक्युरिटी फर्म 'चेक पॉईंट'ने वर्तवली आहे. जगभरात 90 कोटी युजर्स मॅसेजिंगसाठी WhatsApp अॅप्लिकेशनचा वापर करतात.
'चेक पॉईंट'च्या माहितीनुसार, WhatsApp च्या वेब व्हर्जन वापरणार्यांना सर्वाधिक धोका आहे. युजर्सची माहिती चोरण्यासाठी हॅकर्स त्यांचे मोबाइल क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मोबाइल क्रमांक मिळवण्यासाठी ते व्हीकार्ड अॅप्सचा वापर करत आहेत. युजर्सने फोनमध्ये व्हीकार्ड अॅप ओपन करताच टपूण बसलेले हॅकर्स त्यांचा मोबाइल क्रमांक मिळवतात आणि त्यांच्या Whatsapp मधील माहिती हॅक करून घेतात.
हॅकरर्सने या संदर्भात WhatsApp ला गेल्या महिन्यात इशारा दिला होता. परंतु आता त्यांनी व्हीकार्ड अॅपचे अपडेट व्हर्जन लॉन्च केले आहे. त्यामुळे WhatsApp युजर्सला धोका निर्माण झाला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा हॅकर्स कशे चोरतात माहिती ...