आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओ घेणार दहा रुपये पगार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - लीइको ही चीनमधील तंत्रज्ञानाशी संबंधित मोठी कंपनी आहे. मोबाइल हँडसेट, टीव्ही, सेट टॉप बॉक्स बनवण्याच्या क्षेत्रात या कंपनीने गतीने प्रगती केली. इलेक्ट्रिक कार प्रकल्पातही काम सुरू आहे. परंतु प्रमाणापेक्षा अधिक गतीने विकास होत असल्याने रोख रकमेचा मोठा तुटवडा त्यांना जाणवत आहे. अशी परिस्थिती उद््भवल्याने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिया युएतिंग यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून केवळ १० रुपये वेतन घेणार असल्याचे जाहीर केले.

जिया युएतिंग यांची गणती चीनमधील श्रीमंतांमध्ये केली जाते. इलोन मस्कच्या टेस्ला मोटर्ससारख्या तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर नावाजलेल्या कंपनीशी स्पर्धा करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे रोख रकमेचा तुटवडा म्हणजे अडचण नव्हे तर मोठ्या कंपनीला लागलेला आजार असल्याचे ते म्हणतात. त्यांच्या मते, जलद गतीने पुढे जात असताना त्यांच्या कंपनीलाही हा आजार जडला आहे. वैयक्तिक प्रदर्शनात घसरण होणे हेसुद्धा याचेच एक लक्षण आहे. पत्रामध्ये जिया यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय पातळीवर चुका झाल्याचे मान्य केले आहे. जगातील कोणत्याही कंपनीला अशा प्रकारचा अनुभव आला नसल्याचे त्यांचे मत आहे. कंपनीची वाढ ज्या गतीने होत आहे त्या गतीने संघटनात्मक रचनेत बदल होताना दिसत नाही. आमची जागतिक व्यूहरचना खूप पुढची होती, परंतु संसाधने मात्र मर्यादित होती. ग्रुपचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या शाखेने रोख रकमेची वाढती गरज लक्षात घेणे गरजेचे होते. रोख रकमेची वाढलेली गरज पाहता कंपनी आता खर्चावर नियंत्रण मिळवण्याच्या तयारीत आहे. जिया म्हणाले की, कंपनी सध्याच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीकडून समभागधारकांची माफीही मागितली आहे. जिया यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्या प्रश्न उपस्थित करत आहेत. उत्तर देताना "ईको'ने अफवा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.

इलेक्ट्रिक कार प्रकल्पासाठी बहिणीने विकली हिस्सेदारी
‘इको’ने जेव्हा इलेक्ट्रिक कार प्रकल्पामध्ये १२,००० कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्यासमोर रोख रकमेचे संकट होते. त्या वेळी जिया यांच्या बहिणीने त्यांची पूर्ण हिस्सेदारी विकली होती. यातून जो पैसा उभा राहिला तो तिने बिनव्याजी कर्जाच्या रूपात दिला. इतकेच नव्हे तर जिया यांनाही त्यांची हिस्सेदारी विकावी लागली होती. ‘ईको’ सध्या ‘फाराडे फ्यूचर’ नावाने अमेरिकेतील नेवादामध्ये प्लांट उभारत आहे.
बातम्या आणखी आहेत...