आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Change Old Currency Notes Prior To June 30 Says Rbi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2005 आधीच्या नोटा 30 जूनपर्यंत बदला, त्यानंतर द्यावे लागतील कागदपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वर्ष 2005 च्या आधीच्या नोटा कोणत्याही अडचणींविना बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 30 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर या नोटा बदलण्यासाठी संबंधीत बँकेत खाते, ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे राहाणार आहे.
का बदलल्या जाणार नोता ?
आरबीआयची सुरक्षेच्या दृष्टीने ही नियमीत प्रक्रिया आहे. त्यानूसार महात्मा गांधी सीरिज-2005 च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या जात आहेत. आरबीआयचे म्हणणे आहे, की नव्या नोटा सुरक्षेच्या दृष्टीने अधिक चांगल्या असतील. जुन्या नोटांवर छपाईचे वर्ष नाही, तर नव्या नोटांवर एका बाजूने (मागील बाजूने) मध्यभागी छपाईचे वर्ष लिहिलेले आहे.
अनेकदा वाढवली तारीख
आरबीआयने या नोटा बदलण्यासाठी 31 मार्च 2014 ची मुदत दिली होती. नंतर त्यात वाढ करुन 1 जानेवारी 2015 आणि आता अखेर 30 जून 2015 ही तारीख देण्यात आली आहे. नागरीक कोणत्याही बँकेत जाऊन जुन्या नोटा बदलू शकतात. मात्र निर्धारित कालावधीनंतर 500 रुपयांच्या 10 हजारांपेक्षा जास्त नोटा बदलण्यासाठी संबंधीत बँकेत खाते असणे गरजेचे असणार आहे. याशिवाय ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र सोबत असणे गरजेचे आहे. लोक या पैशांच्या बदल्यात रोख रक्कम घेऊ शकतात किंवा स्वतःच्या खात्यात पैसे जमा करु शकतात.
30 जूननंतरही वैध असतील जुन्या नोटा ?
आरबीआयचे म्हणणे आहे, की सध्या चलनात असलेल्या जुन्या नोटांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे त्या परत घेतल्याने फार परिणाम होणार नाही. तसेच या नोटा बदलल्या गेल्या नाही तरी त्या वैध राहातील. बँकानाही निर्देश देण्यात आले आहेत, की एटीएम आणि रोख रक्कम काऊंटरवरुन या नोटा ग्राहकांना देऊ नये.