आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बाजारात चीनपेक्षा जास्त वाढीची अपेक्षा : जिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बंगळुरू - भारतीय बाजारात भविष्यात विकासाची जास्त शक्यता असून लवकरच भारत चीनच्या पुढे जाईल. कंपनी यासाठी तयारी करत असून पुढील टप्प्यात भारतीय बाजारावर कब्जा करण्याची तयारी करत असल्याचे लाइको कंपनीचे अध्यक्ष तसेच सहसंस्थापक वाय. टी. जिया यांनी गुरुवारी बीजिंगमध्ये कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत सांगितले. यासाठी कंपनीला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टीव्ही, स्मार्टफोन, कंटेंट उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनांसह इंटरनेटसंबंधी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये लाइको प्रमुख कंपनी आहे. हाँगकाँग, भारत, रशिया आणि अमेरिकेसह जगभरात कंपनीचा विस्तार करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील व्यवसाय कंपनीच्या प्राथमिकतेत आहे. कंपनी नवीन गुंतवणुकीच्या माध्यमातून विस्तार करून भारतीय बाजारावर दबदबा निर्माण करण्याची तयारी करत असल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारतातील महत्त्वाच्या बाजारात अस्तित्व सिद्ध करण्यावर कंपनीचे लक्ष केंद्रित असल्याचे पत्रात जिया यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...