आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या आश्वासनानंतर घसरणीला ब्रेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या चार िदवसांपासून घसरणाऱ्या बाजाराला चीनच्या शिखर बँकेने युअान चलनाचे अाणखी अवमूल्यन हाेण्याचे काेणतेही कारण नाही, असे अाश्वासन िदल्यामुळे माेठा अाधार िमळाला. त्यातच पाेषक अार्थिक अाकडेवारी जाहीर झाल्यामुळे त्यात अाणखी भर पडली. परिणामी घसरणीला लगाम बसून सेन्सेक्समध्ये ३७ अंकाची वाढ झाली. सेन्सेक्स २७,६३५.२५ अंकांच्या पातळीवर उघडला. िदवसअखेर त्यात ३७.२७ अंकांची वाढ हाेऊन ताे २७,५४९.५३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार िदवसांत सेन्सेक्स ७८५.८७ अंकांनी अापटला हाेता. िनफ्टी ६.४० अंकांनी वाढला. अांतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये चीन, हाँगकाँग, जपान, िसंगापूर, दक्षिण काेरिया, तैवान शेअर बाजारात चांगली वाढ झाली.