आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्युच्युअल फंडांच्या तक्रारी झाल्या कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०१४-१५ दरम्यान म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत जवळपास २१,००० तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारींची संख्या ३० टक्के कमी झाल्या आहेत. म्युच्युअल फंड कंपन्यांनी तक्रारींचे त्वरित निवारण करण्याच्या व्यवस्थेत केलेल्या सुधारणांमुळे हे शक्य झाले आहे. सर्वात जास्त तक्रारी माहितीमधील सुधारणा करण्याच्या होत्या. यात पत्त्यातील चुका, नॉमिनेशन आणि चुकीचा पॅन नंबर आदी प्रमुख तक्रारी होत्या.
म्युच्युअल फंड उद्योगातील माहीतगारांच्या मते, अनेक कंपन्यांनी तक्रारींचे निवारण करण्याच्या व्यवस्थेत सुधारणा केली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारादेखील िदलेल्या वेळेच्या आत होत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानुसार गेल्या आर्थिक वर्षात २०,९६३ तक्रारी आल्या. त्या तुलनेत २०१३-१४ मध्ये ३०,९६३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.