आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Download Duplicate Aadhar Card Copy By These Steps

अवघ्या काही मिनिटांत मिळवा DUPLICATE आधार कार्ड, वाचा सोप्या Steps

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुमचे आधार कार्ड हरवले आहे का? चिंता करु नका. अवघ्या काही मिनिटांत तुम्ही डुप्लिकेट आधार कार्ड मिळवू शकतात. मात्र, यासाठी एनरोलमेंट स्लिप गरजेची आहे. एनरोलमेंट क्रमांकाच्या मदतीने वेबसाइटवरून तुम्ही सहज डुप्लिकेट आधार कार्ड मिळवू शकतात.

काय आहे एनरोलमेंट
आधार कार्ड बनवताना आधी व्यक्तीची एनरोलमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाते. आधार कार्ड केंद्रावर कार्यरत असलेले कर्मचारी व्यक्तीची संपूर्ण माहिती कॉम्प्यूटरवरील एका फॉर्ममध्ये भरून घेतात. नंतर संबंधित व्यक्तीला एक एनरोलमेंट स्लिप (पावती) दिली जाते. त्यावर एक क्रमांक असतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे ऐनरोलमेंट स्लिप सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. त्याद्वारे तुम्ही आपले आधार कार्ड स्टेटस माहीत करून घेऊ शकतात. ही सुविधा वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे आपल्याला मिळालेले आधार कार्ड क्रमांक अथवा एनरोलमेंट क्रमांक कुठे तरी नोंदवून ठेवा. भविष्यात डुप्लिकेट आधार कार्ड मिळवण्यासाठी यांची गरज भासू शकते.
डुप्लिकेट आधार कार्ड मिळवण्याच्या स्टेप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...