आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Service Tax Rate On AC Restaurant Bills

फक्त \"एसी\' रेस्तराँमध्ये द्यावा लागेल सेवाकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काेणत्याही अास्थापनांमध्ये असलेल्या रेस्तराँ किंवा खानावळीमध्ये वातानुकूल किंवा सेंट्रल हीटिंगसारख्या सुविधा नसतात. त्यामुळे त्यांना सेवाकरातून वगळण्यात अाले अाहे. अन्य शब्दांत सांगायचे तर केवळ एअर कंिडशन िकंवा एअर हीटेड रेस्तराँमध्ये सेवाकर
भरावा लागेल, असे अर्थ मंत्रालयाने एका अध्यादेशामध्ये म्हटले अाहे.

वातानुकूलित सुविधा नसलेल्या रेस्तराँमध्ये ग्राहकांकडून काेणताही सेवाकर अाकारला जाणार नाही, परंतु वातानुकूलित सुविधा असल्यास एकूण िबल रकमेवर ४० टक्के शुल्क अाकरण्यात येईल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले अाहे. एअर कंिडशन िकंवा एअर हीटेड रेस्तराँमध्ये सेवाकर अाकारताना एकूण रकमेतून ६० टक्के मूल्य वजा केले जाईल अाणि उरलेल्या ४० टक्के रकमेवर सेवाकर अाकारणी केली जाईल, असे या अध्यादेशात म्हटले अाहे.

सेवा महागण्याची शक्यता
शिक्षण उपकराचा एक भाग म्हणून एक जूनपासून सेवाकरात वाढ करून ताे १४ टक्क्यांवर नेण्यात अाला असून एकूण रकमेच्या ५.६ टक्के परिणामकारक कर अाकारणी करण्यात येईल. एक जूनअगाेदर िशक्षण उपकरासह सेवाकर हा १२.३६ टक्के असून परिणामकारक कर हा ४.९४ टक्के अाहे. सेवाकरात वाढ केल्यानंतर रेल्वे, विमान, बँका, विमा, जाहिरात, बांधकाम, क्रेडिट कार्ड, इव्हेंट मॅनेजमेंट, पर्यटन, अार्किटेक्चर या क्षेत्रांतील सेवा महागण्याची शक्यता अाहे.