आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा हा एक छोटा उपाय करा, इतरांसमोर हात पसरावे लागणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाढत्या महागाईसोबत आपल्या दैनंदिन गरजाही वाढत आहेत. अशा वेळी अचानक समोर आलेल्या खर्चाने बजेटचे तीन तेरा वाजतात. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी इमरजन्सी फंड असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजची बचत हिच उद्याची सुरक्षा आहे. एक जुनी म्हण आहे, की १०० रुपये कमवा, पण त्यातील १० रुपये बचत करा. याच बचतिला इमरन्सी फंड म्हटले जाते. याचा सर्वांत मोठा फायदा हा आहे, की त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन घेण्याची, क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याची किंवा मित्रांना पैसे मागण्याची नामुष्कीची वेळ येणार नाही.
 
का आवश्यक आहे इमरजन्सी फंड
अचानक उद्भवलेल्या संकटामुळे इमरजन्सी फंडची गरज भासते. यावेळी लगेच पैशांची गरज असते. त्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता. कुटुंबात एकच कमावती व्यक्ती असेल तर अशा फंडची वारंवार गरज भासते. अशा वेळी पैशांची ठोस व्यवस्था असणे आवश्यक असते.
 
पुढील स्लाईडवर वाचा... कसा जमवावा इमरजन्सी फंड... तो किती असावा... आणि बरेच काही
 
बातम्या आणखी आहेत...