आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Epfo Aims To Cap Pf Withdrawal Before Retirement At 75 Percent

पीएफ खातेधारकांना निवृत्तीच्या वयापर्यंत काढता येणार नाही पूर्ण रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पीएफ खातेधारक दोन महिने बेरोजगार राहिला तर पीएफचे सर्व पैसे काढू शकतो, हा नियम बदलण्याचा सरकारचा विचार आहे. या नव्या प्रस्तावानुसार खातेधारकाला निवृत्तीच्या वयापर्यंत अर्थात 58 वर्षे वयापर्यंत फक्त 75 टक्के रक्कम काढता येणार आहेत.

अशा आशयाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे मंजुरीसाठी आला असल्याची माहिती कामगार सचिव शंकर अग्रवाल यांनी दिली. या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीएफ आयुक्त के. के. जालान यांनी देखील सांगितले आहे.

या प्रस्तावावर कर्मचारी संघटनादेखील सहमत आहेत. घराचे बांधकाम, लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी 75 टक्के रक्कम काढण्यास मंजुरी असेल, असेही जालान यांनी सांगितले. हळूहळू याची मुदत 50 टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. सध्या रक्कम काढण्यासाठी वर्षभरात 1.3 कोटी अर्ज येतात, त्यातील 65 लाख अर्ज हे पीएफमधील पूर्ण रक्कम काढण्यासाठी असतात, असेे जालान यांनी सांगितले.