आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PF खातेदारकांना निवृत्तीपर्यंत घरे देण्याच्या योजनेवर विचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इपीएफओ (EPFO) म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असणाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत घर मिळावे यासाठी साठी एक योजना सुरू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. दत्तात्रेय यांच्या हस्ते पीएफ नियर यू या योजनेची सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

निवृत्तीपर्यंत कसे मिळेल घर?
- दत्‍तात्रेय यांनी याबाबत फार माहिती दिली नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO सरकारी बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, सरकारी कन्सट्रक्श कंपन्या आणि डीडीए (डेल्‍ही डेव्हलपमेंट अथॉरिटी), पीयूडीए (पंजाब अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी), हुडा (हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी) अशा संस्थांबरोबर करार करणार आहे. त्याअंतर्गत सरकारकडून ठरावीक किमतीत घरे तयार करून घेतली जातील.

- सरकार घर बनवण्यासाठी जी किमान किंमत ठरवेल त्यासाठी EPFO गुंतवणूक करेल. EPFO कडे एकूण 6.5 लाख कोटी रुपयांचा निधी आहे. त्यात दरवर्षी 70 हजार कोटींची वाढ होते. EPFO ने त्यांच्या निधीपैकी 70 हजार कोटी रुपये अफोर्डेबल हाऊसिंग स्कीमसाठी ठेवले आहेत. हा पैसा सदस्यांना कर्जापोटी दिला जाणार आहे.
- सर्वांना 2022 पर्यंत घर उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेंतर्गत ईपीएफओ निधी देईल. सुरुवातीच्या दौऱ्यात ईपीएफओ मेंबर्सना कर्जावर 3.5 लाख स्वस्त घरे दिले जातील.

योजनेबाबत लवकरच रिपोर्ट
जालान यांनी सांगितले की, सध्या एक समिती या योजनेबाबत अभ्यास करत आहे. या समितीमध्ये EPFO च्या ट्रस्टींसह कामगार मंत्रालयाचे मोठे अधिकारीही आहेत. ते लवकरच रिपोर्ट सादर करणार आहेत.

पीएफ नियर यू...
10 जुलै पासून सुरू करण्यात आलेली सरकारची पीएफ नियर यू योजना EPFO शी संबंधित सदस्यांमध्ये संवाद वाढवण्यासाठी उचललेले पाऊल आहे. यापूर्वीच्या भविष्‍य निर्वाह निधी न्यायालयाची जागा या योजनेने घेतली आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला देशभरातील EPFO च्या सर्व 122 कार्यालयात त्याचे आयोजन केले जाईल.