आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निर्वाह निधीचे ७५०० कोटी शेअर्समध्ये गुंतवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना (ईपीएफओ) निधीतील पाच टक्के रक्कम शेअर्समध्ये गुंतवण्याच्या आपल्या निर्णयावर सरकार ठाम आहे. सरकारने हा नियम लागू केला तर ईपीएफओच्या निधीतील ७,५०० कोटी रुपये गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात जातील. यास कर्मचारी संघटना विरोध करत आहेत.
विशेष म्हणजे ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत (सीबीटी) सरकारचा हा नियम लागू करण्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबत चर्चा झाली होती. केंद्रीय भविष्य निर्वाह आयुक्त के.के. जालान यांनी सांगितले, वित्त मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे संघटनेसाठी बंधनकारक आहे की नाही याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
लवकरच लागू होणार नियम

ईपीएफओचे पैसे लवकरात लवकर शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी सरकारने तयारी चालवली आहे. कामगार सचिव शंकर अग्रवाल यांनी सांगितले, ईपीएफओच्या नव्या गुंतवणूक संरचनेला लवकरच मंजुरी मिळणार आहे. ईपीएफओकडे सुमारे १.५ लाख कोटी रुपये जमा आहेत. याच्या पाच टक्के अर्थात ७५०० कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले जातील. दरम्यान मजुरांचा, कर्मचाऱ्यांचा पैसा यामुळे जोखमीत अडकणार असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनांनी दिली आहे.