आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • EPFO To Launch Online PF Withdrawal Facility In 3 Months

खुशखबर: तीन महिन्यांत ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या तीन महिन्यांत ईपीएफओ ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. त्याचा फायदा देशभरातील ६ कोटी पीएफधारकांना होणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर पीएफधारकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइनच अर्ज करता येईल आणि ही रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

कामगार मंत्रालयाने २४ जुलै रोजी ईपीएफओच्या कामगार विश्वस्तांची बैठक बोलावली असून या बैठकीत ऑनलाइन पीएफ काढण्याच्या सुविधेवर चर्चा होणार आहे.

नियमही बदलणार
सध्या सलग दोन महिने कुठेही नोकरीला नसल्याचे सांगून पीएफची सर्व रक्कम काढता येते. हा नियम बदलून वयाची ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत पीएफधारकाला त्याच्या एकूण पीएफ रकमेच्या ७५ टक्केच रक्कम काढता येण्याची तरतूद प्रस्तावित आहे.