आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीकली इकॉनॉमी: इक्विटीत धोका कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्याजदरात घट होणार असल्याची बाब मी ह्या स्तंभाच्या माध्यमातून सतत काही आठवड्यांपासून सांगत आलो आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने मोठ्या दराच्या मुदत ठेव, डाकघर बचत योजना आणि करमुक्त रोखे यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. बँकेत विविध मुदत ठेवींवरील व्याजदर घटून ७-७.२५ टक्क्यांवर (ज्येष्ठ नागरिकांसाठी +२५ टक्के) आला आहे. डाकघर बचत योजनांचे व्याजदर आणखी ०.१ टक्क्यांनी घटले आहे. करमुक्त रोख्यांचे (टॅक्सफ्री बाँड्स) यील्डही घटून ६ टक्क्यांवर आले आहे. सध्या सर्वात आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठीची बचत योजना (८.२५ टक्के), सरकारी बचत रोखे (८ टक्के) आणि किसान विकास पत्र (७.७ टक्के) या योजनांवर मिळत आहे. मार्च २०१७ पर्यंत व्याजदरात आणखी घट होण्याची शक्यता आहे. महागाईत वेगाने वाढ झाली नाही तर रिझर्व्ह बँक त्या वेळेपर्यंत दर आणखी कमी करू शकते. या वर्षी पाऊस चांगला असल्याने खाण्या-पिण्याच्या वस्तूंची महागाई वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे विविध मुदत ठेवींवरील व्याजदर घटून ७ टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००१ नंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच स्थिती आता निर्माण होईल, असेही म्हटले जात आहे. पाच ते सहा वर्षांची मॅच्युरिटी असलेले टॅक्सफ्री बाँड्स (एनएचएआय, आयआरएफसी आदी.) ५.७-५.८ टक्के यील्ड देत आहेत. जर आपण कराच्या ३० टक्क्यांच्या वरील टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असलो तर ती स्थिती चांगली राहील. या टॅक्स रेटवर आपणाला ८ टक्क्यांचे व्याजदर टॅक्सनंतर ५.६ टक्के पडेल. टॅक्सफ्री बाँड्सवर मिळणाऱ्या व्याजाच्या तुलनेत हा आकडा थोडा कमी आहे. परंतु दीर्घ कालावधीच्या म्हणजेच ज्यांची मॅच्युरिटी २०२२ च्या पुढे आहे त्यांची लिक्विडिटी कमी होईल. अशा बाँड्सची खरेदी-विक्री करता येणे अवघड आहे.
बँकेच्या ठेवीमध्ये जास्त पैसे ठेवल्याने व्याजदराच्या रूपात आपली वार्षिक कमाई कमी होईल. म्हणजेच तुम्हाला गुंतवणुकीचा एक हिस्सा इक्विटीमध्ये गुंतवावा लागेल. असे केले तरच ते फायद्याचे ठरू शकते. याचाच अर्थ तुम्ही बचतीचा ८० टक्के हिस्सा बँक एफडी, डेट म्युच्युअल फंड्समध्ये आणि २० टक्के हिस्सा इक्विटीमध्ये लावला असेल तर तुम्हाला हे प्रमाण ७०:३० असे ठेवता येईल किंवा तुमच्या धोका पत्करण्याच्या क्षमतेनुसार यात प्रमाण ठेवता येते. अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर विदेशातील आयटी क्षेत्रातील लोकांना त्यांच्या देशात बंदी लादली जाऊ शकते. त्यामुळे भारतीय आयटी उद्योगाला मोठा फटका बसेल. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे ब्रिटनमध्ये व्यावसायिक अडचणी आणखी वाढतील. या पद्धतीच्या एका संरक्षणवादी जगात आर्थिक वेग मंदावण्याची शक्यता आहे.
भारताबद्दल बोलायचे झाल्यास आर्थिक गती वाढण्याची शक्यता आहे. २०१७-१८ मध्ये डेट-इक्विटीमध्ये विदेशी गुंतवणूक आणखी वाढू शकते. इतर उभरत्या बाजारात गुंतवणुकीच्या संधी कमी झाल्याने त्याचा परिणाम याच्यावर होऊ शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत हा जगात चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इक्विटीमध्ये तितक्या प्रमाणात धोका दिसत नाही. रिअल इस्टेट आणि सोन्याच्या गुंतवणुकीत मोठा धोका आहे. या दोन्हींच्या किमती स्थिर आहेत. जर तुम्ही स्वत: राहण्यासाठी घर विकत घेत असाल तर काही हरकत नाही. जर तुम्ही घर खरेदी करून भाड्याने देण्याचा विचार करत असाल तर ईएमआयच्या अर्धी रक्कमही निघू शकत नाही.

rjagannathan@dbcorp.in लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...