आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर इंडिगाे का ठरली अाकाशाची राणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अापल्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रावर सध्या ताेट्यात चाललेल्या कंपन्यांचा भार अाहे. एअर इंिडया, जेट एअरवेजपासून ते स्पाइस जेटपर्यंत सर्व माेठ्या विमान कंपन्या अनेक वर्षांपासून ताेट्यात अाहेत, परंतु इंिडगाे कंपनी मात्र त्याला अपवाद ठरली अाहे. ही कंपनी सलग सात वर्षे नफ्यात अाहे. या कंपनीची प्राथमिक समभाग विक्रीच्या (अायपीअाे) माध्यमातून २,५०० काेटी रुपयांचा िनधी भांडवल बाजारातून उभारण्याची याेजना अाहे.

अाजपासून दहा वर्षांपूर्वी ज्या विमान कंपनीचा ठावठिकाणाही नव्हता ती कंपनी अाज इतक्या उंचीवर जाऊन कशी पाेहोचली, असा प्रश्न पडणे स्वाभाविक अाहे. विशेष म्हणजे अन्य विमान कंपन्या ताेट्यात असताना ही कंपनी मात्र नफ्यात अाहे. ‘इंिडगाे’ या ब्रँड नावाने स्वस्त विमान सेवा देणाऱ्या इंटरग्लाेब एंटरप्रायझेस या कंपनीने भांडवल बाजारात अायपीअाे अाणण्यासाठी अलीकडेच सेबीकडे दस्तएेवज दाखल केले अाहेत. गुंतवणूकदारांनी या कंपनीचे समभाग खरेदी करावे का? की अन्य विमान कंपन्यांचे कटू अनुभव लक्षात घेऊन सावध भूमिका घेतली पाहिजे? ज्या गुंतवणूकदारांनी जेट, िकंगफिशर अाणि स्पाइसजेट या कंपन्यांमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली त्या सगळ्यांचे हात पाेळले अाहेत. अाता हे समजावून घेऊया की, शेवटी इंिडगाेमध्ये नेमके काय अाहे? अन्य विमान कंपन्या अाता ज्या परिस्थितीत विमान सेवा देत अाहेत त्याच परिस्थितीत इंिडगाेदेखील सेवा देत अाहे, मग ही कंपनी नफ्यात कशी ?
पहिली गाेष्ट अशी की, इंिडगाेने अापले पूर्ण लक्ष उत्पादन खर्च कमीत कमी कसा हाेईल यावर लक्ष केंद्रित केले अाहे. अायपीअाे प्राॅस्पेक्टसमध्ये देण्यात अालेल्या माहितीनुसार इंिडगाेची प्रती उपलब्ध अासन िकमीच्या (एएसकेएम) तुलनेत देखभाल खर्च हा केवळ ११ पैसे अाहे, जेटचा हा खर्च ७४ पैसे अाहे. एएसकेएम म्हणजे प्रती िकलाेमीटर अंतर पार करण्यासाठी प्रती अासन खर्च िकती येताे हे माेजण्याची एक पद्धत अाहे. इंिडगाेचा देखभाल खर्च हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची जेट एअरवेज या कंपनीच्या तुलनेत केवळ १/६ अाहे.

दुसरी गाेष्ट म्हणजे, अापल्या सर्व विमान सेवांसाठी कंपनी एकाच प्रकारच्या विमानांचा (ए ३२०) वापर करते अाणि दर िदवशी या विमानांचा जास्तीत जास्त (११ तास) वापर केला जाताे. या रणनीतीमुळे एकच विमानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त फेऱ्या कशा मारता येतील हे कंपनीला सुनिश्चित करता येते. या कंपनीच्या ताफ्यातील विमानांचे वय फक्त ३.२६ वर्षे अाहे. कंपनी ६ वर्षांपेक्षा जास्त वयाची विमाने ताफ्यात ठेवत नाही. या उपायांमुळे इंिडगाेला देखभाल खर्च कमी ठेवण्यात यश अाले अाहे.

ितसरी गाेष्ट म्हणजे विमानाच्या भाड्याबाबतही सहजसाेपी रणनीती अाखली अाहे. कंपनी विमान प्रवाशांसाठी एकतर िकचकट असे िफ्रक्वेंट फ्लायर पॅकेज ठेवत नाही, ना विमान प्रवासात माेफत खाद्य उपलब्ध करून देते. कंपनीचे मुख्य लक्ष हे विमानांचे उड्डाण वेळेवर हाेईल यावर अाहे. ज्या व्यक्तींनी इंिडगाेतून विमान प्रवास केला असेल त्यांना एक गाेष्ट जाणवली असेल की कंपनी विमान उडण्याच्या दाेन तास अगाेदर विमानतळावर रिपाेर्ट करण्यासाठी प्रवाशांना सांगते. विमान जमिनीवर उतरण्याअगाेदर विमान प्रवाशांना त्यांच्याकडे असलेला कचरा हवाई सुंदरीकडून अाणल्या जाणाऱ्या िपशवीमध्ये टाकण्यास सांिगतले जाते. या उपायांमुळे देखील इंिडगाेला अापल्या विमानांच्या उड्डाणाच्या वेळांचे िनयाेजन करणे सुकर हाेते.

या सर्व उपाययाेजना म्हणजे अन्य स्पर्धक कंपन्यांकडून उपयाेगात अाणल्या जाणाऱ्या िकचकट अाणि महागड्या रणनीतीच्या तुलनेत नेमक्या उलट्या अाहेत. एअर सहारा ही कंपनी जेट एअरवेजने माेठी िकंमत माेजून खरेदी केली हाेती. एक वेळ अशी हाेती की जेट, जेट कनेक्ट अाणि जेट लाइट या तीन ब्रँड नावांनी विमान सेवा िदली जात हाेती. या तीन ब्रँडमध्ये काय फरक अाहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न न करता प्रवाशांनी स्वस्त भाड्याला प्राधान्य िदले. िकंगफिशरने देखील डेक्कन एअर खरेदी केल्यावर हीच चूक केली. िकंगफिशर अाणि िकंगफिशर रेड या दाेन ब्रँड नावांनी विमान सेवा सुरू केली. यामध्ये िकंगफिशर रेड ही स्वस्त विमानसेवा देणारी हाेती. या वेळी देखील या दाेन विमान कंपन्यांमध्ये काय फरक अाहे हे विमान प्रवाशांनी जाणून घेतले नाही. कारण दाेन्ही विमान सेवांमध्ये िकंगफिशर हे एकसारखेच नाव हाेते. िकंगफिशरने अापल्या विमान प्रवाशांना इअरफाेन अाणि खानपान सेवा माेफत देऊ केली हाेती.

एअर इंिडयाचा िवचार करायचा झाला तर या कंपनीबद्दल कमीच बाेललेले बरे. या कंपनीचा राजकीय नेते अाणि अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी खूप दुरुपयाेग करून घेतला. कर्मचारी संघटनांच्या अधेमधे झालेल्या संपांचा एअर इंिडयाच्या विमानसेवेवर परिणाम झाला. त्यामुळे नाराज प्रवाशांनी या सेवेपासून दूर राहणे पसंत केले.
स्पाइस जेट अाणि गाेएअरची कामगिरी चांगली राहिली, परंतु स्पाइस जेटच्या खरेदीनंतर सन टीव्ही समूहाचे मारन बंधू यांना एक जाणीव झाली की इंिडगाेबराेबर स्पर्धा करणे साेपे नाही. त्यासाठीच ते यातून बाहेर पडले. गाेएअरबद्दल सांगायचे तर अापले कामकाज मर्यादित ठेवल्यामुळे ही कंपनी चांगले काम करीत अाहे. जास्त ताेटा असलेल्या हवाई मार्गांवर सेवा देण्यापासून कंपनी दूर राहते, पण सध्या तरी या दाेन्ही कंपन्या इंिडगाेला अाव्हान देण्यासाठी कधी सक्षम हाेतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या तरी इंिडगाेच विजयी अाहे अाणि त्याचे साधे साेपे कारण म्हणजे उत्पादन खर्चाची बचत. जाेपर्यंत या मुद्द्यावर अन्य काेणतीही विमान कंपनी अाव्हान देत नाही ताेपर्यंत इंिडगाेच खऱ्या अर्थाने अाकाशाची राणी म्हणून राहील.

rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.