आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारित विशेष सवलत याेजनेला मुदतवाढ, इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या उत्पादनाला मिळेल गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने सुधारित विशेष सवलत याेजनेला अाणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याशिवाय या याेजनेचा अावाका वाढवण्यासाठी अाणखी १५ नवीन उत्पादनांचा याेजनेत समावेश करण्यात अाला अाहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात अाला. "मेक इन इंडिया' अाणि "डिजिटल इंडिया' या दाेन महत्त्वाकांक्षी याेजनांना प्राेत्साहन देण्याचा यामागे उद्देश अाहे.

इलेक्ट्राॅनिक उत्पादनांची मागणी वाढणार : पुढील सहा वर्षांमध्ये इलेक्ट्राॅनिक वस्तूंची देशातील मागणी ४०० अब्ज डाॅलरपर्यंत जाण्याचा अंदाज अाहे. इलेक्ट्राॅनिक क्षेत्रात १०० अब्ज डाॅलरची गुंतवणूक हाेण्याची शक्यता असून त्यामुळे २.८ काेटी लाेकांना राेजगार मिळण्याची अाशा अाहे.
या नवीन उत्पादनांचा समावेश: स्मार्ट कार्ड, ग्राहकाेपयाेगी वस्तू (फ्रिज, वाॅशिंग मशीन, वातानुकूलित यंत्रे), इलेक्ट्राॅनिक उत्पादनांचे डिझाइन, अाॅप्टिक फायबर अाणि इंटरनेट अाॅफ थिंग्ज या उत्पादनांचा याेजनेत समावेश करण्यात अाला अाहे.