आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Indian Branch Of Bank Of China To Get Open In Mumbai. News In Marathi

देशाच्या आर्थिक राजधानीत सुरु होणार \'बँक ऑफ चाइना\'ची पहिली शाखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लवकरच 'बँक ऑफ चाइना'ची पहिली शाखा सुरु होणार आहे. 'बँक ऑफ चाइना'ची देशातील पहिली शाखा सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

बँक ऑफ चाइनाचे पर्यवेक्षकीय बोर्डाचे संचालक ली जून यांच्या अध्यक्षेखाली शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बॅँक ऑफ चाइनाला योग्य ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी ली जून यांना दिले. याप्रसंगी बँक ऑफ चायनाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना चीन भेटीचे निमंत्रणही दिले.

बँक ऑफ चाइना ही चीनमधील अग्रेसर बँक आहे. काही दिवसांपूर्वी मेक इन महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर राज्यात विदेशी गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चीनचा दौरा केला होता. या दौर्‍यादरम्यान बँक ऑफ इंडियाने मुंबईत आपली शाखा सुरु करण्‍याचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला मंजुरी दिली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भारत-चीन संबंध होती वृद्धिंगत...