आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारची इन्कम टॅक्‍स न देणाऱ्यांवर नजर, करवाढीसाठी छोट्या शहरांवरही फोकस वाढवणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार आता अशा लोकांची नोंद करणार आहे जे करपात्र आहेत, पण कर देत नाहीत. यासाठी सरकार खासकरून लहान शहरांवर फोकस करणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्रादेशिक प्राप्तिकर प्रमुखांना एक लेटर पाठवले आहे. यात अशा प्रकारच्या लोकांच्या नोंदी करण्याविषयी सांगण्यात आले आहे.
 
आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये टॅक्स बेस वाढवण्यावर जोर
- सीबीडीटी चेअरमन सुशील चंद्रा यांनी प्रादेशिक प्राप्तिकर प्रमुखांना लेटर पाठवले आहे. यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये टॅक्स बेस वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. तथापि, गत आर्थिक वर्षात नव्याने 91 लाख करदात्यांचा कराच्या परिघात समावेश झाला आहे.
 
संभावित करदात्यांना शोधणे आता सोपे
- चंद्रा यांनी लेटरमध्ये म्हटले की, नोटबंदी आणि ऑपरेशन क्लीन मनीनुसार इन्कम टॅक्स विभागाची डाटा माइनिंग आणि डाटा अॅनालिसिसमुळे संभावित करदात्यांनो ओळखणे आता सोपे झाले आहे. टॅक्स बेस वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्याचे खूप चांगले परिणाम समोर येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...