आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Loan At Low Interest Rate Only If You Are A SBI\'s Good Customer News In Marathi

SBIने लॉन्च केली नवी योजना, ग्राहकांना मिळेल स्वस्त व्याजदरात Home Loan

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना लॉन्च केली आहे. 'क्रेडिट खजाना' असे या योजनेचे नाव आहे. मात्र, ही योजना फक्त चांगल्या ग्राहकांसाठीच असल्याचे एसबीआयच्या सुत्रांनी सांगितले आहे. चांगले ग्राहक म्हणजे ज्यांच्याकडे थकबाकी नाही. तसेच त्यांचे कर्जाचे हप्ते नियमित सुरु आहेत. तेच ग्राहक या योजनेस पात्र ठरणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
क्रेडिट खजाना' स्कीमनुसार, दुसर्‍या कर्जावर विशेष सूट मिळणार आहे. तसेच या योजनेनुसार चांगले ग्राहक स्वस्त दरात कार, एज्युकेशन आणि पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात. आधीच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा पाव टक्क्याने ते स्वस्त असेल.

> 'क्रेडिट खजाना' या योजनेचा लाभ फक्त एसबीआयचेच ग्राहक घेऊ शकतात.
> एसबीआयचे होम लोन घेऊन एक वर्ष पूर्ण झालेले असावे.
> कर्जाचे हप्ते (इएमआय) नियमित भरलेले असावेत.
> वर्षभरात एकही इएमआय बाऊन्स झालेला नसावा. अशाच ग्राहकांना बँक दुसर्‍यांदा कर्ज उपलब्ध करून देते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, 'मार्जिन मनी'मध्येही मिळते विशेष सूट