आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे भाव २७,००० वर, सलग तिसर्‍या दिवशी वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्वेलरीची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव एका महिन्यानंतर २७,००० रुपये प्रति तोळ्यावर गेले आहेत. सोन्याच्या किमतीमध्ये सलग तीन दिवसांपासून वाढ होत आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याच्या किमती ४०० रुपयांनी वाढून २७,२५० रुपये प्रति तोळ्यावर गेल्या. ज्वेलरीमध्ये मागणी वाढल्यानेच सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आणि भाव वधारले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीदेखील वाढल्या असून चांदी ११०० रुपयांच्या वाढीसह ३६,५०० रुपये प्रति किलोवर गेली आहे.

जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याची किंमत २.११ टक्क्यांनी वाढून ११५४.१० डॉलर प्रति तोळ्यावर गेली आहे. २४ ऑगस्टनंतरची ही सर्वाेच्च पातळी आहे. सोन्याच्या किमतीत वाढ आणि देशात वाढलेली ज्वेलरीची मागणी यामुळेच सोन्याच्या किमती वाढत असल्याचे ट्रेडर्सनी सांगितले. सणामुळे आगामी काळात मागणी वाढू शकते डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेल्या पडझडीमुळे देशातील बाजारात सोन्याच्या किमतीला मदत मिळत आहे.