आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या नोटा बंद झाल्याने सोने तस्करीत झाली घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने अचानक पाचशे तसेच एक हजारच्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे सोने तस्करीवर त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे देशात सुरू असलेल्या सोने आयातीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. चीननंतर जगातील सर्वात जास्त सोने आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. सध्या सोन्यावर सरकारने दहा टक्के आयात शुल्क लावलेले आहे. त्यामुळे सोने आयातीत मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात येत होती. तस्करीच्या मार्गाने बाजारात येणारे सोने सबसिडी असल्याप्रमाणे कमी दराने विक्री होत होते. मात्र, आता सरकारने मोठ्या नोटा बंद केल्यामुळे तस्करीच्या माध्यमातून भारतात येणाऱ्या सोन्यावर त्याचा परिणाम झाला असून सोने तस्करीमध्ये घट दिसून आली आहे.

अधिकृतरीत्या विदेशातून सोने आयात करणाऱ्या आयातकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. अधिकृतपणे विदेशातून साेने आयात करणाऱ्या बुलियन डिलर्सने प्रती औंसवर सहा डॉलर प्रीमियम वसूल केला. तर गेल्या आठवड्यात सोन्यावर तीन डॉलर प्रतिऔंस डिस्काउंट द्यावा लागला होता. तस्करीच्या माध्यमातून भारता येणाऱ्या सोन्याने बाजारावर पकड निर्माण केली होती. त्यामुळे बाजारात सोने सवलतीच्या दरात उपलब्ध होत होते. मात्र, आता मोठ्या नोटा बंद झाल्याने तस्करीच्या माध्यमातून येणारे सोने बंद झाले असल्याचे मत भारतीय ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अधिकृत व्यवसाय, बँक आणि रिफायनरी व्यवसाय पुन्हा योग्य मार्गाने सुरू होणार असून जुलै महिन्यात तस्करीचे सोने १०० डॉलर प्रतिआैंसच्या विक्रमी सवलतीत विक्री झाले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

तस्करीच्या माध्यमातून १६० टन सोने आयात
जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार वर्ष २०१६ मध्ये देशात तस्करीच्या माध्यमातून १६० टन सोने आयात झाले असल्याचा अंदाज आहे, तर वर्ष २०१५ मध्ये १०० ते १२० टन सोने तस्करीच्या माध्यमातून भारतात आले होते. मोठ्या नोटा बंद झाल्यामुळे देशात तस्करीच्या माध्यमातून येणाऱ्या सोन्यात घट झाली असल्याचे जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे बच्छराज बामालवा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...