आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने 29 हजारांच्या घरात, 40 दिवसात 17 टक्के वाढ; आणखी महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक बाजारात मागणी वाढल्याने व भारतीय बाजारपेठेतही दागिन्यांची खरेदी वाढल्याने गुरुवारी सोन्याच्या भावात वाढ झाली. सुमारे 18 महिन्यानंतर सोने प्रथम उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. गुरुवारी नवी दिल्ली व मुंबईत सोन्याचा प्रतितोळा भाव 28 हजार 800 रूपये इतका होता. जागतिक शेअर बाजारात चिंता असल्याने व क्रूड तेलाच्या किंमती सातत्याने घसरत असल्याने गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दुसरीकडे, चांदीच्या भावात कोणतेही वाढ नसून गुरुवारी चांदीचे भाव प्रतिकिलो 130 रूपयांनी खाली आले. चांदीचे प्रतिकिलो दर 37 हजार 100 रूपये इतके आहेत.
काय वाढतेय सोने-
- शेअर बाजार घसरले की गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करतात. हा जगभर ट्रेंड चालतो.
- जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली असून, त्यामुळे तेजी वाढली आहे. भारतात घरगुती वापराच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.
- डॉलरच्या तुलनेत रूपया कमजोर झाल्याने आयात शुल्क वाढले आहे. त्याचाही किंमत वाढण्यावर परिणाम झाला आहे.
40 दिवसांत 17 टक्क्याने वधारला सोन्याचा भाव-
- 1 जानेवारी 2016 रोजी भारतात सोन्याची किंमत 24, 500 रूपये इतकी होती.
- 11 फेब्रुवारी रोजी सोन्याची किंमत 28, 800 रूपये प्रतितोळा झाली आहे.
- 1 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या 40 दिवसाच्या दरम्यान अंतर्गत बाजारपेठेत 17 टक्के भाव वधारले आहेत.
- गेल्या दहा दिवसात सोने 1 हजार 40 रूपयांनी महागले आहे.
जागतिक बाजारात किरकोळ वाढ-
भारतात ज्या पद्धतीने भाववाढ झाली आहे त्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून येत नाही. सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव 1.5 टक्के वाढले तेथे 1214 डॉलर प्रति औंस सोने मिळत आहे.
30 हजारांच्या घरात जाणार सोने-
बुलियन अॅंड ज्वेलरी असोसिएशनचे जनरल सचिव योगेश सिंघल यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात घसरण होण्याचे दिवस आता गेले आहेत. सोने 24.500 रूपयांच्या खालच्या पातळीवर पोहचले होते. मात्र, मागील काही दिवसापासून भारतात मागणी वाढल्याने तेजी आली आहे. लग्नाचा सिजन जवळ येत असल्याने स्थानिक बाजारपेठेत तेजी कायम राहील व येत्या काही दिवसात सोने पुन्हा 30 हजारांच्या घरात जाईल असे सिंघल यांनी सांगितले.