आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Golden Opportunity To Buy Property At Low Prices In SBI Mega Property E Auction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SBI चा \'मेगा ई-लिलाव\', कम‍ी किमतीत मिळतील घरे; 42 शहरांत 300 प्रॉपर्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्ली- भारतीय स्टेट बॅंकेचा (एसबीआय) 'प्रॉपर्टी मेगा लिलाव' 12 जून रोजी आहे. देशातील 42 शहरात ऑफिस स्पेस, दुकाने, अपार्टमेंट, फॅक्टरी बिल्डिंग आणि प्लॅट अशा एकूण 300 प्रॉपर्टीसाठी ऑनलाइन बोली लावली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करून या मेगा लिलावात सहभागी होण्याचे आवाहन एसबीआयतर्फे करण्‍यात आले आहे. या आधी मार्च महिन्यात एसबीआयने अशाच प्रकारचा मेगा ई-लिलाव आयोजित केला होता.

असा घ्या सहभाग
एसबीआयच्या पॉपर्टी मेगा लिलावात सहभाग घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. विशेष म्हणजे ई-लिलावात बोली लावण्यासाठी आपल्याकडे एक कॉम्प्युटर आणि नेट कनेक्शन आवश्यक आहे. लिलावाविषयी अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर 079-40230801-34 किंवा 0120-4888888 फोन करून संपर्क करू शकतात.
या शहरांमध्ये आहे प्रॉपर्टी
अहमदाबाद, अलाहाबाद, बंगळुरु, भोपाळ, दि‍ल्ली, हैदराबाद, इंदूर, जयपुर, जालंधर, कानपुर, कोलकाता, कोल्हापुर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पाटणा, पुणे, रायपुर, राजकोट, रांची, सलेम, सिकंदराबाद, ठाणे, तिरुवनंतपुरम, तिरुपुर, बडोदा, वलसाड, वाराणसी, विशाखापट्टनम, औरंगाबाद, भावनगर, भुवनेश्वर, बर्दवान, चेन्‍नई, कोयंबटूर, कटक, एर्नाकुलम, गोंदिया, कालना, लुधियाना, मदुरै.

मेगा लिलाव?
एनपीएवरील ओझे हलके करण्‍यासाठी एसबीआय काही प्रॉपर्टीचा ई-लिलाव करणार आहे. मार्च महिन्यात एसबीआयने पहिला प्रॉपर्टी मेगा ई-लिलाव आयोजित केला होता. परंतु, यात हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने एसबीआयने पुन्हा एकदा ई-लिलाव आयोजित केला आहे.

गृहकर्जाची सुविधा
'प्रॉपर्टी मेगा लिलाव' यशस्वी करण्यासाठी एसबीआयतर्फे गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.