आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना मासिक 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन- गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांना गेल्या वर्षात पगार आणि इतर भत्त्यांसह २० कोटी डॉलर (सुमारे १,२८५ कोटी रुपये) मिळाले होते. या दरम्यान त्यांचा मासिक पगार १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिला आहे. २०१६ मध्ये त्यांना पगाराच्या स्वरूपात ४.१७ कोटी रुपये मिळाले, जे २०१५ मध्ये भत्त्यांसह मिळालेल्या ४.१९ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र, २०१६ मध्ये पिचाई यांना २,२७७ कोटी रुपये मूल्याच्या कंपनीचे शेअर (स्टॉक ऑप्शन) मिळाले, जे २०१५ च्या तुलनेत जवळपास दुप्पट जास्त आहेत. २०१५ मध्ये त्यांना ६४१ कोटी रुपयांचे स्टॉक ऑप्शन मिळाले होते.भारतात जन्म झालेल्या ४४ वर्षीय पिचाई यांना गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये सीईओ केले होते. त्याआधी ते कर्मचारी म्हणून काम करत होते. 
 
जास्त पगाराची कारणे  
- गुगलच्या कॉम्पेन्सेशन समितीने पिचाईंना एवढे मोठे पॅकेज, अनेक उत्पादनाच्या यशस्वितेमुळे दिले आहे.  
- पिचाई यांच्या नेतृत्वात गुगलच्या जाहिराती आणि यूट्यूब व्यवसायात वाढ झाली.
- काही वर्षांत गुगलने नवीन स्मार्टफोन, व्हर्च्युअल रिअॅलिटी हँडसेट, राउटर व व्हॉइस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर आणले त्यामुळे कंपनीचा नफा वाढला.
- हार्डवेअर आणि क्लाउड सर्व्हिसेससारख्या क्षेत्रात व्यवसायात वाढ होत आहे.  
- कंपनीचा महसूल वाढून १९,९१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा गेल्या वर्षी समान तिमाहीच्या तुलनेत दीडपट जास्त आहे. 
बातम्या आणखी आहेत...