आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर कायद्यातील दुरुस्तीने सरकारी उत्पन्न वाढेल : तज्ज्ञ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्राप्तिकर कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीचे कर तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढेल त्याच बरोबर काळा पैसा असणाऱ्यांसाठी ही संधी ठरणार आहे. ५० टक्के कर भरून ते सुटणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या पैशावर लागणाऱ्या दंडातील अनिश्चितता यामुळे पूर्णपणे संपली असल्याचे मत कन्सल्टन्सी संस्था केपीएमजीचे गिरीश वनवारी यांनी सांगितले. यामुळे सरकारचे उत्पन्न वाढणार आहे. अर्न्स्ट अँड यंगचे प्रमुख सुधीर कपाडिया यांच्या मते, नंतर ८५% पर्यंत कर लागणार असल्याने लोक ५०% चा पर्याय निवडतील. ग्रान्ट थॉर्नटनचे संचालक रियाज थिंग्ना यांनी सांगितले की, नव्या नियमामुळे अघोषित पैसे बाळगणाऱ्यांना यातून बाहेर पडण्यासाठी एक योग्य मार्ग सापडू शकतो.
बातम्या आणखी आहेत...