आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HSBC Business To Get Confined As Banking Major Plans To Cut Up To 50K

HSBC बॅंकेत \'बिग रिसेशन\', 50 हजार कर्मचार्‍यांना देणार \'नारळ\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉंगकॉंग- युरोपातील सगळ्यात मोठी बॅंक 'एचएसबीसी' सुमारे 50 हजार कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरु करण्‍यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी मंगळवारी जाहीर केले. कामाचा दर्जा सुधारण्यासाठी बॅंकेने हा निर्णय घेतला आहे. जवळपास 20 टक्के कर्मचार्‍यांची कपात केली जाणार आहे. परिणामी, एचएसबीसी यासाठी आपली गुंतवणूक मर्यादा सीमित केली आहे. ज्यात जास्त जोखीम असेल तिथे बँंक 290 अब्ज डॉलर्सने कमी गुंतवणूक करणार आहे.
ब्राझिल आणि तुर्की येथील बँकेच्या शाखेतून जवळपास 25 हजार तर मुख्य शाखेतून 22 ते 25 हजार कर्मचार्‍यांना घरी बसवण्यात येणार आहे. गुंतवणूकदार आणि विश्लेषकांना मार्गदर्शन देण्यापूर्वी एचएसबीसीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुलिवर यांनी हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंजला ही धक्कादायक माहिती दिली. स्‍टुअर्ट गुलिवर हे आपला सगळ्या मोठा स्‍ट्रॅटजिक प्‍लानचा आढावा गुंतवणूकदारांना दिला.
फक्त 2.08 लाख कायमस्वरुपी कर्मचारी
'एचएसबीसी' मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे. कपात केल्यानंतर एचएसबीसीमध्ये फक्त 2,08,000 कायमस्वरुपी कर्मचारी उरतील. 2010 मध्ये बॅंकमध्ये एकूण 2,95,000 कर्मचारी होते. दरम्यान 2014 मध्ये ही संख्या 2,58,000 वर आली होती. आता बॅंकेने सुमारे 50 हजार कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कपाती प्रक्रीया 2017 पर्यंत चालणार आहे.

दरम्यान, या कपातीनंतर बॅंकेच्या कम्‍प्‍लायन्स डिव्हिजन आणि ग्रोथ बिझनेसमध्ये काही नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप नव्या नियुक्तीविषयी बँकेच्या सुत्रांनी माहिती दिली नाही.
काय म्हणतात एक्सपर्ट्‍स...
फक्त कर्मचारी कपात करून एचएसबीसी बँकेचा प्रश्न सुटणार नाही. बँक व्यवस्थापनाने आपल्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत सुधारणा करणे गरजेचे आहे, असे 'मिझहो सिक्‍युरिटी आशिया'चे विशेज्ज्ञ जेम्‍स अँटॉस यांनी म्हटले आहे.