आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Atm Transaction Failed Money Deducted, Then Bank Will Give You 100 Rs Per Day

ATM युजर्ससाठी फायद्याचे:... तर बँक देईल दररोज 100 रुपये नुकसान भरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशीष कुमार एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. आशीष एटीएममधून 10 हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी कार्ड स्वॅप करून पिन टाकला आणि 10 हजाराची नोंद केली. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे कटले, मात्र एटीएममधून पैसेच बाहेर आले नाही. त्यानंतर आशीष संबंधीत बँकेत गेला आणि आरबीआयच्या एटीएम ट्रान्झॅक्शनच्या गाईडलाईन प्रमाणे त्याने प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्याला 10,800 रुपये परत केले. म्हणजेच 800 रुपये जास्त. जर अशाच परिस्थितीत तुम्हीही अडकलात तर बँकेकडून कशा प्रकारे भरपाई मिळवाल. माहित नाही ना.. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 7 सोप्या स्टेपमध्ये... 

सर्वात पहिले आरबीआय एटीएम ट्रान्झॅक्शन गाईडलाईन समजून घेऊयात - 
1- आरबीआय गाईडलाईन प्रमाणे, अकाऊंटमधून पैसे कटले मात्र एटीएममधून तुम्हाला ते मिळाले नाही, अशा प्रसंगी 7 दिवसांच्या आत (कार्यालयीन दिवस) बँक त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये पैसे पुन्हा टाकेल. जर असे झाले नाही तर, पेमेंट आणि सेटेलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 अंतर्गत बँक 100 रुपये/दिवस या हिशोबाने नुकसान भरपाई देईल. 

2- ट्रांझॅक्शनच्या 30 दिवसांच्या आत तक्रार केल्यावरसुध्दा एटीएम यूजरला बँकेकडून भरपाई घेण्याचा हक्क आहे. यानंतर तक्रार केल्यानंतर बँकेला भरपाई देण्यास बंधन नसते. 

पुढील स्लाईडवर क्लीक करून, जाणून घ्या 7 सोप्या स्टेपमध्ये बँकेकडून कशी घ्या दररोज 100 रुपये नुकसान भरपाई...