आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 हजार असेल बेसिक तर PF वर मिळतील 2 कोटी, केंद्र सरकारी हमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही संगठित क्षेत्रात काम करता आणि तुमची बेसिक सॅलरी जर १५ हजार रुपये आहे तर रिटायरमेंटच्या वयापर्यंत तुमच्या पीएफ फंडवर सुमारे २ कोटी रुपये जमा झालेले असेल. यासाठी आवश्यक आहे, की तुम्ही पीएफ फंडवर नियमित कॉन्ट्रिब्यूट करता. तसेच वेळेच्या आधी पीएफ काढू नये. या पैशांच्या बळावर तुम्ही रिटायरमेंटचे आयुष्य आरामात काढू शकता.

 

कसे होतील २ कोटी रुपये
पीएफ फंडमध्ये २ कोटी कसे जमा होतील हे जाणून घेणे फार रंजक आहे. एका उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. समजा आकाशचे वय ३० वर्षे आहे. तो संघटित क्षेत्रात काम करतो. त्याची बेसिक सॅलरी १५ हजार रुपये आहे. तसेच त्याच्या पीएफ फंडमध्ये १ लाख रुपयांचा बॅलंस आहे. त्याच्या पगारात वार्षिक १० टक्के वाढ गृहित धरली तर पुढील ३० वर्षांत त्याच्या पीएफ खात्यात सुमारे २ कोटी रुपये जमा होतील.

 

वय- ३० वर्षे
बेसिक सॅलरी- १५,०००
पीएफ कॉन्ट्रिब्युशन- १२ टक्के
कंपनीचे कॉन्ट्रिब्युशन- १२ टक्के
सॅलरीत वाढ- १० टक्के वार्षिक
रिटायरमेंटचे वय- ६० वर्षे
सध्याचे बॅलेंस- १ लाख रुपये

 

नोट- इम्लॉई प्रॉव्हिडंट फंड सध्या ८.६५ टक्के व्याज मिळते. केंद्र सरकार याचा रेट प्रत्येक वेळी निश्चित करते.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कसे वाढविता येईल पीएफ कॉन्ट्रिब्युशन...

बातम्या आणखी आहेत...