आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व प्राप्तिकर परतावे बँक खात्यांत जमा होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्राप्तिकराचे सर्व परतावे लवकरच बँक खात्यांत जमा होतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) त्यासाठी नवी व्यवस्था तयार करत आहे. सध्या प्राप्तिकर विभाग काही परतावे धनादेशाद्वारे पाठवते. चुकीच्या खात्यांत परतावे जमा होत असल्याच्या तक्रारी असून त्या दूर करण्याचाही मंडळाचा प्रयत्न आहे. मंडळ रिझर्व्ह बँकेच्याही संपर्कात आहे.

सीबीडीटीच्या अध्यक्षा अनिता कपूर यांनी सांगितले की, सध्या करदात्यांच्या खात्यांत परतावा पाठवला जातो त्या वेळी बँक खात्यांसोबत खाते क्रमांक ताडून पाहिला जात नाही. ते फक्त खाते क्रमांक पाहतात. परतावा पाठवण्याआधी करदात्याचा खाते क्रमांक आणि नाव बँकेशी पडताळून पाहता येऊ शकेल, असा प्रयत्न आहे.
बातम्या आणखी आहेत...