Home | Business | Personal Finance | check epf balance without internet within 60 seconds

फक्त 60 सेकंदात जाणून घ्या, इंटरनेटशिवाय तुमचे EPF बॅलन्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 29, 2017, 12:45 AM IST

नवी दिल्ली - नोकरवर्गासाठी पीएफ म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. एक्स्पर्ट सांगतात की पीएफ शक्यतो रिटायरमेंटपर्यंत

 • check epf balance without internet within 60 seconds
  नवी दिल्ली - नोकरवर्गासाठी पीएफ म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. एक्स्पर्ट सांगतात की पीएफ शक्यतो रिटायरमेंटपर्यंत काढू नये. त्याशिवाय तुमच्या पगारातून पीएफसाठी जी रक्कम कापली जातेय ती वेळेवर भरल्या जातेय की नाही, हे ही तपासणे महत्त्वाचे ठरते. यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही विना इंटरनेट तुमचे पीएफ बॅलन्स तपासू शकता.
 • check epf balance without internet within 60 seconds
  मिस्ड कॉल
   
  तुमच्या मोबाईलवरून पीएफ बॅलन्स तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉल केल्यावर अवघ्या काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर तुमची पीएफ बॅलन्स दिसेल. 
   
 • check epf balance without internet within 60 seconds
  असा करा एसएमएस
   
  ईपीएफओ एसएमएस सेवाच्या माध्यमातूनही तुम्हाला खात्यातील रकमेची माहिती कळू शकेल. 07738299899 या क्रमांकावर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून एसएमएस करावा लागेल. एसएमएस पाठवितांना मॅसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN ENG असे लिहून 07738299899 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या पीएफ रकमेचा मॅसेज येईल. विशेष म्हणजे हा मॅसेज तुम्हाला वेगवेळ्या भाषेतून मिळविता येऊ शकतो. 
   

Trending