Home | Business | Personal Finance | Do not do these mistakes while investing in business

व्यवसायात पैसे गुंतवणूक करत असाल, तर करु नका या 5 चुका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2017, 01:13 PM IST

नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच

 • Do not do these mistakes while investing in business
  नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करण्याची वेळ आली तर आपण असंख्य वेळा विचार करतो. गुंतवणूक केलेला पैसा बुडणार तर नाही ना, याची कायम चिंता सतावत असते. त्याशिवाय असंख्य प्रश्नांचा कल्लोळ आपल्या मनात सुरु असतो. हे न होण्यासाठी आपण आपला पैसा आपल्याच व्यवसायत लावल्यास अधिक फायदा होईल. मात्र, यापूर्वी या पाच चुका न केलेल्या कधीही चांगल्याच ठरतील.
  पुढील स्लाईडवर वाचा - या पैशांची करा गुंतवणूक
 • Do not do these mistakes while investing in business
  - कोणत्याही व्यवसायात पैशांची गुंतवणूक करतांना जो पैसा वाया गेला तरीही त्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणार नाही. याची काळजी घ्यावी. 
  - कोणत्याच व्यवसायात शाश्वती नसते की तुम्ही लावलेला पैसा बुडणार नाही.
  - कोणत्या व्यवसायाची अधोगती कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.
   
  पुढे वाचा - कायदा जरुर पाळा
   
 • Do not do these mistakes while investing in business
  - बहुतांश वेळा लोक कायद्याचे नियम जाणून घेता व्यवसायात गुंतवणूक करतात.
  - कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी कायद्यातील तरतूदी जाणून घ्याव्यात.
  - त्यामुळे भविष्यात या कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापासून वाचू शकता.
  - कोणत्याही व्यवसायात कायद्याच्या तरतूदी जाणून घेण्यापूर्वी केलेली गुंतवणूक जोखीम ठरू शकते.
   
  पुढे वाचा - व्यवसायाचा विमा हवा
   
 • Do not do these mistakes while investing in business
  - कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी विम्याबद्दल माहिती करून घ्यावी.
  - विमा घेतल्याने गुंतवणूकदार सुरक्षित राहतात.
  - विमा घेतांना पॉलिसी होल्डरसह इन्व्हेस्टर्सचाही तोटा होणार नाही याची काळजी घ्यावी.
   
  पुढे वाचा - फायनान्शिअल रिझल्ट माहिती करून घ्या
   
 • Do not do these mistakes while investing in business
  - कोणत्याही व्यवसायाची सुरवात करण्यापूर्वी त्याचा फायनान्शिअल रिझल्ट माहित करून घेणे महत्त्वाचे ठरते.
  - फायनान्शिअल रिझल्टवरून कळते की या क्षेत्रातील उलाढाल वाढली की कमी झाली.
  - फायनान्शिअल रिझल्टवरून लक्षात येते की हा व्यवसाय फायद्यात राहिल की तोट्यात.
   
  पुढे वाचा - रिटर्न करा फ्रुफ
   
 • Do not do these mistakes while investing in business
  - व्यवसायात गुंतवणूक करतांना लेखी प्रमाण असणे आवश्यक आहे.
  - अॅग्रीमेंट, टर्म, कंडीशन, लिमीटेशन आदी बाबी लेखी असल्यास तुम्ही विनाकारण चिंतेपासून दुर रहाल.
  - त्याशिवाय भविष्यात उद्भवणाऱ्या अडणींचा सामना करण्यास तुम्ही तयार असता.

Trending