Home | Business | Personal Finance | ICICI bank launches cashback home loans

ही आहे पहिलीवाहिली होमलोनवर कॅशबॅक देणारी बँक, प्रत्येक EMI वर मिळेल कॅशबॅक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 29, 2017, 02:11 PM IST

नवी दिल्ली - दिवाळी-दसऱ्यानिमीत्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या आयसीआयसीआयने सर्

 • ICICI bank launches cashback home loans
  नवी दिल्ली - दिवाळी-दसऱ्यानिमीत्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या आयसीआयसीआयने सर्वप्रथम कॅशबॅक ऑफर होमलोनसाठी सुरु केली आहे. या होमलोन योजनेअंतर्गत प्रत्येक मासिक हप्त्यावर एक टक्के रक्कम ग्राहकांना परत मिळणार आहे. बँकेने सांगितले की, जोपर्यंत गृहकर्जाची परतफेड सुरु राहील, तोपर्यंत या योजनेचा लाभ मिळत राहिल. ही ऑफर किमान 15 ते जास्तीतजास्त 30 वर्षे कर्जासाठी उपलब्ध आहे.
  पुढील स्लाईडवर वाचा - अशी आहे योजना
 • ICICI bank launches cashback home loans
  खात्यात जमा होणार कॅशबॅक
   
  कॅशबॅक रक्कम खातेधारकांच्या खात्यात दिली जाईल अथवा त्याच्या पुढच्या ईएमआयमधून कपात केली जाईल. मात्र, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ग्राहकांना सुरवातीला 36 महिने सलग हप्ता द्यावा लागेल. त्यानंतर नियमाप्रमाणे कॅशबॅक रक्कम खात्यात जमा केली जाईल. 
   
  पुढे वाचा - या खातेधारकांना होईल लाभ
 • ICICI bank launches cashback home loans
  या खातेधारकांना होईल फायदा
   
  बँकेने दिलेल्या माहितीनुसार, होमलोन घेणारे नवे ग्राहक आणि तारण कर्ज घेणाऱ्यांसाठी ही योजना असेल. त्याशिवाय दुसऱ्या बँकेतून आयसीआयसीआयमध्ये होमलोन ट्रान्सफर केलेल्या ग्राहकांनाही याचा फायदा होईल. 

Trending