आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेश पोलिसांकडून 2 क्रेडिट कार्ड हॅकर्सला मुंबईत अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मध्यप्रदेश पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड हॅकर गँगचा पर्दाफाश करीत या प्रकरणातील सोमवारी 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांनी क्रेडिट कार्ड हॅक करून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्या पोलिसांनी लावला आहे. या गँगचे सदस्य असल्याच्या संशयावरून मुंबईतील दोन जणांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही गँग मूळ पाकिस्तानी रहिवासी असलेला शेख अफजल हा चालवित असल्याचा पोलिसांना संशय आहे.
 
याबाबत मध्यप्रदेश येथील पोलिस अधीक्षक जितेंद्र सिंग म्हणाले की, या गँगचे सदस्य असल्याच्या कारणावरून रामकुमार पिलाई आणि रामप्रसाद नादर या दोघांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. माळवा जिल्ह्यात दाखल झालेल्या क्रेडिट कार्डच्या तक्रारीवरून पोलिस हॅकर्सचा शोध घेत होते. 
 
पोलिस म्हणाले, की शेख अफजल हा मूळ लाहोर या शहरातील असून त्याचे गेल्यावर्षी लग्न झाले. शेख अफजलने आतापर्यंत जगातील विविध देशांना भेटी दिल्या आहेत. तो उझबेकिस्तानात असतांना नादर आणि पिलाई स्काईपच्या माध्यमातून संपर्कात आले. सध्या आम्ही या प्रकरणात अधिक शोध घेत आहोत.
 
या गँगचे सदस्य क्रेडिट कार्ड हॅक करून त्याद्वारे विमानाची तिकीटे, टुर पॅकेजेस खरेदी करायचे. या पैशातूनच बँकॉक, थायलंड, दुबई, हाँगकाँग आणि मलेशिया सारख्या ठिकाणी खरेदी केली. त्याशिवाय त्यांनी अनेक हॅक केलेल्या कार्डद्वारे महागड्या वस्तूही खरेदी केलेल्या आहेत. 
ते वापरत असलेल्या पद्धतीमध्ये ओटीपीची आवश्यकता भासत नसे. त्यामुळे त्यांना विविध ठिकाणी खरेदी करण्यास सोपे जात होते. त्यानंतर व्यवहारांची तपासणी केल्यावर खऱ्या क्रेडिट कार्डधारकाला कार्ड हॅक झाल्याचे कळायचे. तोपर्यंत बराच उशीर झालेला असायचा. प्राथमिक तपासणी पूर्ण केली असून आतापर्यंत त्यांनी 17 क्रेडिट कार्डद्वारे 20 लाख रुपयांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
बातम्या आणखी आहेत...