Home »Business »Personal Finance» Secure Monthly Income Of 3 Lakhs

सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रम, दसऱ्यानंतर 11 दिवसांत 7 लाख कोटी रुपयांनी वाढले मार्केट

दिव्य मराठी नेटवर्क | Oct 17, 2017, 02:19 AM IST

मुंबई-दीपावलीच्या दोन दिवस आधी सोमवारी शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. सेन्सेक्स २००.९५ अंक वृद्धीसह ३२,६३३.६४ वर बंद झाला. निफ्टीही ६३.४० अंकासह १०,२३०.८५ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांची क्लोजिंग विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.

एअरटेलमध्ये सर्वाधिक ४.९६%, महिंद्रा ३.०८% व टाटा मोटर्समध्ये २.८५% तेजी राहिली. तज्ज्ञांनुसार, महागाईत घट, औद्योगिक उत्पादनात वाढ, प्रमुख कंपन्यांचे सुखावह चित्र व भारताबाबत आयएमएफच्या उत्साहवर्धक अंदाजाने तेजी आली. ब्रोकिंग फर्म जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले, आगामी काळात निर्देशांकामध्ये जास्त महत्त्व असणाऱ्या कंपन्यांच्या प्रदर्शनावर बाजाराची दिशा अवलंबून राहील. जागतिक अर्थव्यवस्थेमध्येही वृद्धीचा अंदाज आहे. यामुळे निर्यात वाढेल.
११ दिवसांत ४.३% वाढला सेन्सेक्स, मार्केट कॅप १३९ लाख कोटी रुपये झाले
दसऱ्यानंतर ११ दिवसांत सेन्सेक्स १,३४९ अंक (४.३%) वाढला. बीएसई मार्केट कॅप ७.१६ लाख कोटींनी वाढून १३९ लाख कोटी झाले. तो जानेवारी ५.६%, जुलैत ५.१% वाढला होता. ऑक्टोबरमध्ये तिसरी मोठी वाढ आहे.
बाजारात तेजीची ५ मुख्य कारणे
- आयएमएफ : अर्थव्यवस्था मजबुतीकडे
आयएमएफ प्रमुख क्रिस्टीन लेगार्द शनिवारी म्हणाल्या, भारतीय अर्थव्यवस्था मजबुतीकडे आगेकूच करत आहे.
- महागाई : ठोक महागाई २.६% राहिली
सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई २.६०% होती. ऑगस्टमध्ये ३.२४%वर होती. किरकोळ महागाई ३.२८% राहिली.
- निर्यात : सप्टेंबरमध्ये २६% पर्यंत वाढ
सप्टेंबरमध्ये २६% निर्यात वाढली. वृद्धीदर ६ महिन्यांत सर्वात जास्त. देशांतर्गत मागणी वाढल्याने आयात वाढली.
- चलन : रुपया १९ पैसे बळकट झाला
डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैसे बळकट होऊन ६४.७४ वर आला. याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
- आयआयपी : ९ महिन्यांत वेगाने वाढ
ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात ४.३% वाढ झाली. यामध्ये नऊ महिन्यांत सर्वात वेगवान वाढ नोंदली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा - 20 हजार गुंतवणूकीतून कसे जमवाल 4 कोटी

Next Article

Recommended