आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interest Rate On PF Hiked From 8.75% To 8.8% In FY 2015 16, Says Govt

PF वर 8.8 टक्के दराने मिळेल लाभ; बोनसची घोषणा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ईपीएफओेने 2015-16 साठी पीएफवरील व्याजदर 8.75% वरून 8.80 टक्के केले आहेत. दुसरीकडे, सरकारने पोस्ट खाते अल्पबचत योजनांवरील व्याजदर 0.25 टक्के घटवले आहे. नवे व्याजदर एप्रिल 2016 पासून लागू राहतील. यावर आता दर तिमाहीला बैठक होणार आहे. तसेच दीर्घ कालावधीच्या पीपीएफ (8.75 टक्के), मासिक ठेव योजना (8.4 टक्के), सुकन्यांसारख्या योजनांवर व्याजदर मात्र, कायम ठेवण्यात आले आहेत.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पाच कोटी सदस्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
एप्रिल 2016 पासून मिळेल 8.8% रिटर्न
- पीएफच्या व्याजदरात अल्पवाढ केलेल्याची माहिती देताना केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले, की अर्थमंत्रालयाने 2015-16 च्या व्याजदरावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
- गत अार्थिक वर्षात (2014-15) पीएफवर 8.75% व्याज देण्यात येत होते.

...मात्र बोनस नाही!
- ईपीएफओद्वारा आपल्या सदस्यांना चालू आर्थिक वर्षात 750 कोटी रुपयांचा बोनस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ही शक्यता आता संपुष्टात आली आहे.
- ईपीएफओने चालू आर्थिक वर्षात व्याजदरात वाढ केली आहे.

अर्थ मंत्रालयने घेतला आक्षेप
- ईपीएफओद्वारा व्याजदरात वाढीच्या निर्णयाला अर्थमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी आक्षेप नोंदवला होता.
- ईपीएफओच्या या निर्णयामुळे इतर स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या योजनावर मिळणार्‍या व्याजदरात देखील वाढ करावी लागेल, असे सरकारने म्हटले होते.